न्यूयॉर्क 26 जुलै: कोरोनावर जगभर संशोधन सुरु आहे. अजुन रामबाण औषध मिळालेलं नसलं तरी कोरोनाबाबत अने गोष्टी पुढे येत आहेत. अमेरिक डॉक्टरांनी केलेल्या एका अभ्यासात आणखी काही गोष्टी पुढे आल्या आहेत. तरुणांमध्ये कोविड हा आजार दीर्घकाळ राहू शकतो असं त्यांना आढळून आलं आहे. फार गंभीर नसली तरी काही लक्षण त्यांना दीर्घकाळ राहू शकतात आणि त्याचा त्रास होऊ शकतो असं त्यांना आढळून आलं. तरुणांना कोविड होत नाही आणि झाला तरीही ते त्या आजारातून लवकर बरे होतात असं म्हटलं जातं. मात्र त्याबाबतही काही वेगळे निष्कर्ष या तज्ज्ञ डॉक्टरांनी काढलेले आहेत. तरुणांना अनेक महिने कोरोनाची काही लक्षणे राहू शकतात. त्याच बरोबर श्वास घेण्यास, त्रास होणं, दम लागणं, थकवा राहाणं या गोष्टी त्यांच्यामध्ये राहू शकतात. त्यामुळे ते पूर्वीसारखं आपलं कामकाज करू शकत नाहीत असंही त्यात आढळून आलं आहे. त्यामुळे काळजी घेणं आणि डॉक्टरांच्याच सल्ल्यानुसार औषधोपचार करणं आवश्यक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. फक्त ताप कोरोनाचं महत्त्वाचं लक्षण नाही; AIIMS च्या अभ्यासातूनही मिळाला दुजोरा ऑक्सफोर्डशिवाय रशिया आणि चीन या देशांनी तयार केलेलं कोरोना वॅक्सीनही अंतिम टप्प्यात आलं असून त्यावर निरीक्षण सुरू आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनासाठी संपूर्णपणे वॅक्सीनंवर अवलंबून राहता येणार नाही. अंतिम टप्प्यातील निरीक्षण आणि प्रत्यक्षात उपलब्ध झाल्यानंतरही सुरुवातीच्या टप्प्यात येणारी आव्हानं यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार कोरोनाचं हे वॅक्सीन केवळ विषाणू किंवा आजाराची गंभीरता कमी करण्याचं सध्या काम करू शकतं. थोडक्यात सांगायचं तर या वॅक्सीनमुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी होऊ शकेल. हे वॅक्सीन सुरक्षित आहे. हे वॅक्सीन कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी शरीरात इम्युनिटी वाढवतं. 1000 हजार वॉलेंटियर्सवर केलेल्या चाचणीनंतर केलेल्या अभ्यासात हे समोर आलं आहे. 5 वर्षांच्या मुलासाठी सोनियाने स्कुटीवरून केला मुंबई-जमशेदपूर 1800 किमी प्रवास कोरोनाचं जगभरात सुरू असलेलं थैमान आणि वेगानं वाढणारा संसर्ग या वॅक्सीनमुळे कमी होईल अशी आशा वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. आताच्या घडीला हे वॅक्सीन कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे थांबवेल असं म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण अजूनही अनेक आव्हानं पार करायची असाचं शास्रज्ञांचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.