Home /News /national /

फक्त ताप कोरोनाचं महत्त्वाचं लक्षण नाही; AIIMS च्या अभ्यासातूनही मिळाला दुजोरा

फक्त ताप कोरोनाचं महत्त्वाचं लक्षण नाही; AIIMS च्या अभ्यासातूनही मिळाला दुजोरा

झारखंडमध्ये आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 6485 पर्यंत पोहोचली असून 64 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 3024 रुग्ण बरे झाले आहेत.

झारखंडमध्ये आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 6485 पर्यंत पोहोचली असून 64 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 3024 रुग्ण बरे झाले आहेत.

अद्यापही देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाहीये, त्यात अनेक रिसर्चमधून नवनवीन माहिती समोर येत आहे

    नवी दिल्ली, 25 जुलै : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडून  (AIIMS) करण्यात आलेल्या अभ्यासातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ताप येणं हे कोरोनाची लागण होण्याचं प्रमुख लक्षण कधी  नव्हतं. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित अभ्यासातून हे स्पष्ट होते. मार्च-एप्रिल या कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसात केवळ 17 टक्के रुग्णांना ताप होता. दिल्लीस्थित एम्समध्ये 23 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या 144 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. उत्तर भारतातील एका केअर सेंटरमध्ये दाखल केलेल्या कोरोना रुग्णांची प्रोफाइल आणि रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या रिसर्चमध्ये 28 अन्य लोकांसह संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांनी एकत्र येऊन लिहिलं आहे. हे वाचा-मोठी बातमी! आमदारांंनंतर देशात पहिल्याच मुख्यमंत्र्याला कोरोनाची लागण News18 ला या शोध पत्रातून ही माहिती मिळाली आहे. त्यानुसार  केवळ 17 टक्के रोगींना तापाचं लक्षण होतं. जे जगभरातील अनेक रिपोर्टच्या तुलनेत खूप कमी आहे. ज्यामध्ये चिनी कोहॉर्ट सहभागी होतं. दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची टेस्ट करण्याचं आवाहन शिवराज सिंह यांनी दिलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी स्वत: ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली आहे. तीन दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्री अरविंद भदोरिया मुख्यमंत्र्यांसोबत लखनऊ दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. 'मला कोविड-19ची लक्षणं दिसत होती त्यामुळे मी चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्वीट करून दिली आहे.' दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या