Home /News /videsh /

बाप रे! कोरोनावरील उपचारानंतर तरुणाला रुग्णालयानं पाठवलं 8.50 कोटींचं बिल

बाप रे! कोरोनावरील उपचारानंतर तरुणाला रुग्णालयानं पाठवलं 8.50 कोटींचं बिल

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाचं रुग्णालयानं दिलेलं बिल पाहून चांगलाच घाम फुटला आहे.

    वॉशिंग्टन, 14 जून : जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. या कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाचं रुग्णालयानं दिलेलं बिल पाहून चांगलाच घाम फुटला आहे. जवळपास 11 लाख डॉलर म्हणजेच जवळपास रुपयात विचार केला तर साडे आठ कोटींचं बिल आलं आहे. हे बिल 181 पानांचं बिल रुग्णाला पाठवलं असून पैसे भरण्यास सांगितले आहेत. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार मायकल फ्लोर यांना 4 मार्च रोजी कोरोनावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 62 दिवस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आपलं आयुष्य एवढंच आहे आता आपण यातून बाहेर पडणार नाही असं मायकल यांना काही क्षण वाटलं. त्यावेळी त्यांना धीर देण्यासाठी पत्नी आणि मुलांसोबत नर्सनं मायकल यांना बोलण्याचा आग्रह केला. हे वाचा-कोविड-19 ची चीनमध्ये दुसरी लाट? मांस-भाजी मार्केटमधून पसरला कोरोना मायकल यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली आणि ते कोरोनाविरुद्ध युद्ध जिंकले. 5 मे रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांनी सिएटल टाइम्सला दिलेल्या वृत्तानुसार रुग्णालयानं त्यांना 181 पानांचं बिल पाठवलं. ज्याची किंमत जवळपास 1,122,501.04 डॉलर एवढी किंमत होती. ICU साठी मागितले होते 74 लाख रुपये मायकल यांची प्रकृती जास्त बिघडल्यानं त्यांना ICUमध्ये हलवण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र तिथे उपचार घेण्यासाठी 74 लाख रुपये आधी भरण्यासाठी सांगण्यात आले होते. मायकल यांचं वय जास्त असल्यानं त्यांना सरकारी मेडिक्लेमचं कव्हर कॅप होती. तरीदेखील त्यांच्याकडून रुग्णालयानं ज्यादा पैसे घेतले असं तिथल्या माध्यमांनी म्हटलं आहे. मला वाचवण्यासाठी लाखो रुपये लागले आहेत. असं सांगणारा मी एकटाच नाहीय अनेक जण असल्याचं मायकल यांनी म्हटलं आहे. हे वाचा-अरे बाप रे! कोरोना लॉकडाऊन पडला भारी, इतका लठ्ठ झाला की हलताडुलताही येईना हे वाचा-COVID-19च्या औषध परिक्षणासाठी उंदरांची कमतरता, शास्त्रज्ञांनी शोधला हा उपाय संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या