जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / कोविड-19 ची चीनमध्ये दुसरी लाट? मांस-भाजी मार्केटमधून पसरला कोरोना

कोविड-19 ची चीनमध्ये दुसरी लाट? मांस-भाजी मार्केटमधून पसरला कोरोना

कोविड-19 ची चीनमध्ये दुसरी लाट? मांस-भाजी मार्केटमधून पसरला कोरोना

चीनमध्ये 24 तासांत 57 नवीन रुग्ण सापडले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीजिंग, 14 जून: चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनाची दुसरी लाट येते का असा प्रश्न आता पुन्हा उपस्थित झाला आहे. चीनमध्ये 24 तासांत 57 नवीन रुग्ण सापडले आहेत. एप्रिलनंतर पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळल्यानं ही मोठी घटना मानली जात आहे. मांस आणि भाजी मार्केटमधून हा कोरोना पसरल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे बीजिंगसह चीनमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं बीजिंगमधील मांस आणि भाजी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी भाजी, अन्न आणि मांस तपासण्याचे आदेश दिले आहात. हा संसर्ग मांस आणि भाज्यांमधून पसरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तपासणीमध्ये सुपरमार्केट, गोदामांमध्ये ताजे आणि फ्रोजन मांस, कोंबडी आणि मासे यांची तपासणी करण्यात येत आहे. जवळपास 9 शाळा आणि किंडरगार्डन बंद केली आहेत. तर बीजिंगमध्ये प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर शनिवारी बीजिंगमधील विमानसेवाही स्थगित करण्यात आली होती. चीनच्या वुहानमधून कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरला आणि 180 देशांमध्ये संक्रमण झालं आहे. चीनमध्ये 76 दिवसांच्या लॉकडाऊनंतर कोरोना कमी झाला असताना आता पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं कोविड-19 चे रुग्ण आढळले आहेत. हे वाचा- कमालच झाली! कोरोनाग्रस्त हेअरस्टायलिस्टच्या संपर्कात आलेल्या एकालाही झाला नाही क हे वाचा- पाकिस्तानात लॉकडाऊन ऐवजी ‘स्मार्ट लॉकडाऊन’ - काय आहे हा प्रकार संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात