कोरोनामुळे 30 लाखांपेक्षा जास्त बळी जाणार, तर 100 कोटी लोकांना लागण होण्याचा धोका

कोरोनामुळे 30 लाखांपेक्षा जास्त बळी जाणार, तर 100 कोटी लोकांना लागण होण्याचा धोका

जगातले 34 गरीब देश यात भरडले जाणार असून त्यात पाकिस्तानचा समावेश असणार आहे.

  • Share this:

लंडन 28 एप्रिल: कोरोनाव्हायरसने जगभर थैमान घातलं आहे. जगातल्या 185 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. 30 लाख लोकांना लागण झाली आहे तर आत्तापर्यंत 2 लाख जणांचा मृत्यू झालाय. या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या International Rescue Committeeने मोठं भाकित केलं आहे. कोरोनामुळे जगभरात तब्बल 100 कोटी लोक बाधित होतील आणि त्यामुळे 30 लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी जाईल अशी भीती IRCने व्यक्त केली आहे. IRCचे प्रमुख डेव्हिड मिलीबँड यांनी तयार केलेल्या अहवालात हा भीतीदायक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

IRCच्या मतेऔषध निघून त्याचा वापर सुरू व्हायला जास्त वेळ लागणार आहे. तोपर्यंत कोरोना आणखी पसरणार आहे. यात आफ्रिका आणि आशियातले गरीब देश सर्वाधिक भरडले जाणार आहेत. या देशांजवळ आर्थिक पाठबळ नाही आणि आरोग्यविषयक सुविधाही नाहीत. त्यामुळे जगातले 34 देश यात पीडित ठरणार आहेत.

या यादीत भारताचा समावेश नाही. मात्र भारताच्या शेजारच्या तीन देशांचा समावेश आहे. यात पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारचा समावेश आहे. सर्वाधिक लोकसंख्या, पायाभूत सुविधांची कमतरता आणि दाट वस्ती यामुळे कुठल्याही नियमांचं पालन होऊ शकत नाही असंही IRCच्या अहवालात म्हटलं आहे.

‘कोरोना’विरुद्ध नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, असा आहे सरकारचा ‘मास्टर प्लान'

जगातल्या बड्या देशांनी या गरीब देशांना मदत करावी. कोरोना ही जागतिक महामारी असेल तर सर्व देशांनी मिळून याचा मुकाबला केला पाहिजे तरच त्यावर मात करता येईल अन्यथा काहीही करता येणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहे. अनेक टेस्ट केल्या जात आहेत, व्यक्तीनुसार तपासण्या होत आहेत. मात्र आता एखाद्या क्षेत्रात कोरोनाव्हायरसचं संक्रमण तर झालं नाही ना हे तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी सांडपाण्याची (Sewage) तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Coronavirus बदलतोय! तुम्ही कल्पनाही केली नसेल इतकं भयंकर आहे अकरावं रूप

कोरोना रुग्णाच्या मलातही व्हायरस असतो. शौचानंतर हा मल मलवाहिन्यांमार्फत सीवेज ट्रिटमेंट प्लांटपर्यंत पोहोचतो आणि त्याचं परीक्षण करून त्या क्षेत्रातील संक्रमणाची माहिती मिळू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. एखाद्या क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असेल तर त्या ठिकाणाच्या सांडपाण्यात संक्रमित मलाची मात्राही जास्त असेल आणि अशा पद्धतीने भरपूर प्रमाणात संक्रमित असलेल्या क्षेत्राची माहिती मिळू शकते.

First published: April 28, 2020, 5:08 PM IST

ताज्या बातम्या