नवी दिल्ली 28 एप्रिल: नरेंद्र मोदी सरकारने कोरोनाविरुद्धची लढाई आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांची संख्या दररोज वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही असं मत आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केलंय. सरकार एका मोठ्या योजनेवर काम करत असून येत्या 31 मे पासून दररोज तब्बल एक लाख लोकांची टेस्ट केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यासाठी लागणाऱ्या टेस्टिंग किट्स या देशातच तयार केल्या जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारतात कोरोनाबाधितांची संख्या आता 29 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. तर मृत्यूचा आकडाही 900च्या वर गेलाय. त्यामुळे कोरोना टेस्टिंग वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. टेस्ट करण्यासाठीच्या 5 लाख किट्स सरकारने चीनमधून आयात केल्या होत्या. मात्र त्या निकृष्ट दर्जाच्या असल्याने सरकारने त्याचं कंत्राटच रद्द केलं आहे. आता अशा प्रकारच्या किट्स देशातच तयार होत आहेत. त्यासाठी ICMRची मान्यता पाहिजे असून त्याची आम्ही वाट पाहत असल्यचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. 31 मे पूर्वी देशात पुरेशा किट्स तयार होतील आणि 31 मेपासून दररोज 1 लाख टेस्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे कोरोनाबाधा झालेल्यांची संख्या कळेल आणि त्यांना आयसोलेट केलं जाणार आहे.
We will be able to produce RT-PCR and antibody test kits in India by May. All processes are in advanced stage and production will start after getting approval from ICMR. It will help us in meeting our target of 1 lakh test per day by May 31: Union Health Minister Dr Harsh Vardhan pic.twitter.com/sSK1zASVsB
— ANI (@ANI) April 28, 2020
देशातल्या 80 जिल्ह्यांमध्ये गेल्या 7 दिवसांमध्ये, 47 जिल्ह्यात 14, तर 39 जिल्ह्यांमध्ये गेल्या 21 दिवसांपासून एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही अशी माहितीही हर्षवर्धन यांनी दिली. **हे वाचा -**महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; शेकडो मजुरांचा आक्रोश भारतात कमी प्रमाणात टेस्टिंग केल्या जातात अशी टीके केली जाते. त्यावर बोलताना ICMRने स्पष्ट केलं की. सर्व निर्णय हे अभ्यास करूनच घेतले जात आहेत. ज्या प्रमाणात टेस्टिंग केलं जात आहे त्यावरून भारतात बाधितांचं प्रमाण कमी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हेही वाचा - Coronavirus बदलतोय! तुम्ही कल्पनाही केली नसेल इतकं भयंकर आहे अकरावं रूप भारत कोरोनाला हरवणार, आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या आकड्यांतून मिळाला मोठा दिलासा