Coronavirus बदलतोय! तुम्ही कल्पनाही केली नसेल इतकं भयंकर आहे अकरावं रूप

Coronavirus बदलतोय! तुम्ही कल्पनाही केली नसेल इतकं भयंकर आहे अकरावं रूप

कोरोनाव्हायरसचा (coronavirus) अकरावं रूप A2a आहे, जो थेट फुफ्फुसांवर (lung) हल्ला करतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 एप्रिल : जगभरात कोरोनाव्हायरसने (coronavirus) 3,073,634 लोकांना विळखा घातला आहे, तर  211,769 बळी घेतलेत. यात आता धक्कादायक माहिती येते आहे, कोरोनाव्हायरस स्वत:मध्ये मोठे बदल करत आहे. कोरोनोव्हायरसने आतापर्यंत स्वत:मध्ये 10 बदल केले, आता तो अकराव्या रूपात आला आहे आणि त्याचं अकरावं रूप खूपच भयंकर आहे.

कोरोनाव्हायरसचं अकरावं रूप आहे A2a. हा व्हायरस आधीच्या व्हायरसपेक्षा जास्त धोकादायक आहे आणि याच व्हायरसमुळे जगातील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे, असं शास्त्रज्ञांना दिसून आलं आहे.

हे वाचा - पालकांनो लक्ष द्या! लहान मुलांमध्ये दिसतायेत Coronavirus ची वेगळी लक्षणं

पश्चिम बंगालमधील कल्याणीतल्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ बायोमेडिकल जिनोमिक्सने (NIBG) कोरोनाव्हायरसचा अभ्यास केला. त्यांना संशोधनात दिसून आलं की, कोरोनाव्हायरसने आता अकरावं रूप घेतलं आहे. कोरोनाव्हायरसचं अकरावं रूप A2a असून खूपच धोकादायक आहे. व्हायरसमधील हा बदल अधिक धोकादायक आहे, कारण तो थेट व्यक्तीच्या फुफ्फुसांवर हल्ला करतो ज्यामुळे व्यक्तीची वाचण्याची शक्यता कमी होते.

शास्त्रज्ञांच्या मते, का व्हायरस SARSCoV सारखा झाला आहे, ज्यांना जवळपास 10 वर्षांपूर्वी 800 लोकांचा बळी घेतला होता आणि 8 हजार लोकांना संक्रमित केलं होतं. हा व्हायरस वेगाने फुफ्फुसावर हल्ला करतो.  A2a व्हायरसचा प्रसार वेगाने होतो आणि तो संपूर्ण जगात पसरत आहे. A2a कोरोनाव्हायरसने आता संपूर्ण जगावर ताबा मिळवला आहे आणि त्यामुळेच जगभरात कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढत आहेत.

हे वाचा - लॉकडाऊननंतर विमान प्रवास करायचा आहे? दाखवावं लागणार मेडिकल सर्टिफेकेट

लवकरच हा रिसर्च जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रसिद्ध केला जाणार आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 28, 2020, 2:28 PM IST

ताज्या बातम्या