न्यूयॉर्क, 20 मे : जगात कोरोनाचा प्रसार काही थांबता थांबत नाही आहे. आतापर्यंत 49 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर, 3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात एकट्या अमेरिकेत 15 लाख कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, 92 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे कोरोनाचा प्रसार तर दुसरीकडे लस शोधण्यासाठी केले जाणारे प्रयत्न या सगळ्यात जगभरातील देश वेगवेगळी औषधं वापरत आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्वत: कोरोनाचा धोका टाळण्यासाठी एका औषधाचे सेवन करत आहेत. हे औषध आहे हायड्रोक्लोरोक्विन. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. ट्रम्प यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हायड्रोक्लोरोक्विन हे औषध घेत असल्याचे सांगितले. हायड्रोक्लोरोक्विन औषधाला काही देशांमध्ये बंदी घातल्यानंतर अमेरिकेत मात्र याचा वापर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला जात आहे. त्यामुळं यावरून अमेरिकेत विरोधकांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. मात्र या चर्चा निरर्थक असल्याचे सांगत ट्रम्प यांनी स्वत: हे औषध घेत असल्याचे स्पष्ट केले. वाचा- आता Mask च करणार कोरोनाचा नाश; व्हायरस पृष्ठभागावर येताच रंग बदलणार वॉशिंग्टनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी गेल्या दीड आठवड्यांपासून हायड्रोक्लोरोक्विन औषध घेण्यास सुरुवात केली. हे एक गुणकारी औषध असल्याचे मी एकलं आहे. या औषधाचे दुष्परिणाम आहेत, असे बोलले जात आहे. मात्र यात काही तथ्य नाही, असेही ते म्हणाले. याआधी हायड्रोक्लोरोक्विन औषधावरून डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते चक स्कमर यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करत या औषधामुळं कोरोनाला रोखू शकतो अशा आशा विनाकारण पल्लवित केल्या आहेत. ट्रम्प यांची ही कृती भयंकर आहे. मात्र या टीकेनंतर ट्रम्प यांनी स्वत: या औषधाचे सेवण करत असल्याचे सांगितले. वाचा- होम क्वारंटाइन व्यक्तिचा संशयास्पद मृत्यू, PPE किट नसल्याने मृतदेह रस्त्यावर दरम्यान, ट्रम्प यांनी भारताकडून हायड्रोक्लोरोक्विन या औषधांची मागणी केली होती. हायड्रोक्लोरोक्विन हे औषध गेली कित्येक वर्ष मलेरिया व इतर आजारांवर घेतले जाते. त्यानंतर कोरोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या औषधाचा वापर केला जाऊ शकतो, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. ट्रम्प रोज करतात कोरोना चाचणी व्हाइट हाउसच्या जवळ कोरोना येऊन पोहचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा वैयक्तिक सेवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. ही व्यक्ती अमेरिकेच्या नौदलातील असून ते राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक सेवेत तैनात होता. याबाबत व्हाइट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले गेले आहे की काळजी करण्याची कोणतीही गोष्ट नाही, परंतु ट्रम्प यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. या घटनेनंतर ट्रम्प म्हणाले की, आजपासून मी रोज कोरोना चाचणी करणार आहे. वाचा- COVID19: डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.