Home /News /videsh /

प्रेमासाठी वाट्टेल ते, ‘कोरोना’चा धोका असताना गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी त्याने केला 10 हजार किमीचा प्रवास

प्रेमासाठी वाट्टेल ते, ‘कोरोना’चा धोका असताना गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी त्याने केला 10 हजार किमीचा प्रवास

फ्रान्सिस्का त्याला घ्यायला आली होती. तिला पाहताच इहाब गुडघ्यावर खाली वाकला आणि तिला प्रपोज केलं.

  कैरो 28 मार्च : कोरोना व्हायरसने सर्व जगाला हादरवून सोडलं. 180 पेक्षा जास्त देश आज कोरोनाने ग्रस्त झाले आहेत. चीनमधल्या वुहानपासून सुरु झालेली ही साथ आता सर्व खंडात पसरली आहे. अनेक देशांनी लॉकडाउन घोषीत केलाय. सर्वजण आपल्या घरात बंद आहेत. गेल्या महिनाभरापासून याची तीव्रता प्रचंड वाढली आहे. जगभर असं भयाण वातावरण असताना इजिप्तच्या इहाब बोराई या तरुणाने आपल्या प्रेयसीला साथ देत प्रपोज करण्यासाठी सर्व धोका पत्करून कैरो ते कॅनडातलं टोरांटो असा 10 हजार किलोमीटरचा प्रवास विमानाने केला. वृद्ध आई वडिलांना सोडून या प्रेमवीराने हा प्रवास कसा केला त्याची ह्रदयस्पर्शी कहाणी CNN ने दिली आहे. इहाब बोराई हा कॅनेडियन-इजिप्शियन नागरीक. तो आपल्या आई वडिलांसोबत कौरोत राहतो. तर त्याची प्रेयसी फ्रान्सिस्का ही इटालीय-अमेरिकन आहे. ती सध्या कॅनडातल्या एका शहरात संशोधन करत आहे. दोघांचही  एकमेकांवर जीवापाड प्रेम. पण काम आणि अभ्यासाच्या निमित्ताने दोघांनाही वेगवेगळ्या देशांमध्ये राहावं लागतंय. अवघ्या 5 मिनिटांत होणार Coronavirus चं निदान, पोर्टेबल टेस्ट किट तयार कोरोनाचं जगभर संक्रमण वाढत असल्याने सगळेच देश आपल्या हवाई सीमा बंद करत होते. फ्रान्सिस्का एकटीच कॅनडात असल्याने इहाबचं सगळं लक्षं तिच्याकडेच लागलं होतं. मात्र 60 वर्ष पार केलेल्या आई वडिलांना सोडून तिच्याकडे जायचं कसं असा त्याला प्रश्न होता. शेवटी मुलाच्या प्रेमासाठी आई वडिलांनी त्याला कॅनडाला जाण्याची परवानगी दिली. तोपर्यंत 19 मार्च उजाडला होता. त्याच दिवशी हवाई सेवा बंद होणार होती. विमानाचं तिकीट 700 डॉलर्सवरून 3 हजारांवर गेलं होतं. प्रवाशांच्या विमानतळावर रांगा लागलेल्या होत्या.

  जगभर कोरोना पसरवला, आता त्याच जोरावर चीन करतोय कमाई

  तिकीट मिळेल की नाही याची काहीच खात्री नव्हती. मात्र इहाबला तिकीट मिळालं आणि त्याने जाण्याचा निर्णय घेतला. फ्रान्सिसला आयसेलेशनमध्ये राहण्याचं काम पडलं तर ती त्या अनोळखी शहरात कशी राहणार या एकाच काळजीने त्याने धोका पत्करला होता.कारण प्रवासात कोरोनाची लागण होण्याची शक्यता होती. LockDown मध्ये घरात येतील वाघ-सिंह, जंगली प्राण्यांसोबत काढा मुलांचे PHOTO त्याने सॅनिटायझर, मास्क सगळं काही घेतलं होतं. मात्र शक्यता नाकारता येत नव्हती. पण प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात. त्यामुळे त्याने कैरो ते टोरंटो हा प्रवास केला. सगळं विमानतळ खाली होतं. फ्रान्सिस्का त्याला घ्यायला आली होती. तिला पाहताच इहाब गुडघ्यावर खाली वाकला आणि तिला प्रपोज केलं. आता तर ती नाही म्हणणं शक्यच नव्हतं. आम्ही दोघांनीही मास्क काढले आणि दिर्घ चुंबन घेतलं. आता कायमचं होण्याचा आम्ही निर्णय घेतल्याचं त्याने म्हटलं आहे. परिस्थिती थोडी निवळली की इटलीत ते दोघही लग्न करणार आहेत.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Love story

  पुढील बातम्या