वॉशिंग्टन, 28 मार्च : अमेरिकेतल्या प्रयोगशाळेनं कोरोनाव्हायरससाठी (Coronavirus) असं टेस्ट किट (test kit) तयार केलं आहे, ज्यामुळे फक्त 5 मिनिटात कोरोनाव्हायरसचं निदान होणार आहे. विशेष म्हणजे हे किट हलकं आणि छोटं आहे, जे कुठेही घेऊन जाणं सोयीस्कर आहे.
अबॉट (Abbott) कंपनीने कोरोनाव्हायरसचं लवकरात लवकर निदान होण्यासाठी टेस्टिंग किट तयार केलं आहे, ज्याला ID NOW COVID-19 असं म्हटलं आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने या किटच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.
हे वाचा - 'कोरोना'पासून बचावासाठी सूट मिळेना, हतबल नर्सनी घातल्या कचऱ्याच्या पिशव्या; फोटो व्हायरल
या किटमुळे कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह असल्यास 5 मिनिटांत समजणार आहे, तर कोरोनाव्हायरस नेगेटिव्ह असल्यास 13 मिनिटात समजणार आहे.
सध्या यूएस, युरोपमधील प्रगत देशांमध्येही प्रयोगशाळेतील चाचण्यांचा अहवाल येण्यासाठी 24 ते 48 तास लागतात. या प्रक्रियेला लागणारा वेळ खूप आहे, शिवाय खर्चिकही आहे. सुरुवातीला स्वॅब नमुने घेतले जातात (घशातील आणि नाकातील नमुने) त्यानंतर लॅबमध्ये RT-PCR च्या माध्यमातून चाचणी केली जाते.
मात्र ID NOW COVID-19 हे अगदी लहान आणि कमी वजनाचं असं पोर्टेबल उपकरण आहे.
हे वाचा - ‘कोरोना’वर लस शोधली? हैदराबादच्या शास्त्रज्ञाचा दावा
कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य संचालन अधिकारी रॉबर्ट फोर्ड यांनी सांगितलं, 'कोविड-19 शी वेगवेगळ्या स्तरावर लढा दिला जातो आहे आणि काही मिनिटात अहवाल देणाऱ्या या पोर्टेबल चाचणीमुळे व्हायरसचं निदान लवकरता लवकर होईल. टेस्ट किट सूक्ष्म आहे, याचा अर्थ रुग्णालयाच्या बाहेरही ही किट वापरता येऊ शकतं'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.