LockDown मध्ये घरात येतील वाघ-सिंह, जंगली प्राण्यांसोबत काढा मुलांचे PHOTO

LockDown मध्ये घरात येतील वाघ-सिंह, जंगली प्राण्यांसोबत काढा मुलांचे PHOTO

गुगल फीचरमुळे तुम्ही लहान मुलांचे वाघ-सिंहासोबतचे फोटो काढू शकता. यातून काढलेले फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 मार्च : देशात लॉकडाउन असल्यानं जवळपास सर्वच लोक घरात आहेत. त्यातच इंटरनेटचा वापरही वाढला आहे. यामध्ये सोशल मीडियावरून अनेक गोष्टी व्हायरल होत. सध्या एक भन्नाट ट्रेंड आला आहे. गुगलनेच खास फीचर यासाठी दिलं आहे. 3 डी प्राणी तुमच्या आजुबाजुला दिसणार आहेत. गुगलचं हे फीचर वापरून अनेकांनी घरात मुलं प्राण्यांसोबत खेळत असल्याचे फोटो काढले आहेत.

गुगलचं प्राण्यांबाबतचं हे फीचर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये घरी बसून तुम्हाला 3D प्राणी पाहता येतील. एवढंच नाही तर त्यांचा आवाजही ऐकू येईल. या फीचरच्या माध्यमातून मोबाइलवर जंगलातरे प्राणी 3D पाहता येणार आहे.

जंगलातले प्राणी 3D पाण्यासाठी Google Home Page कोणत्याही प्राण्याचे नाव सर्च करा. तुम्हा Tiger सर्च केल्यास वाघाच्या फोटोसह माहिती येईल.

वाघाच्या माहितीनंतर खाली एक पर्याय असेल. Meet a Life Size Tiger Up Close (View in 3D) यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला 3D वाघ पाहता येईल. तुम्ही त्याला कोणत्याही बाजूने पाहू शकता. तसंच त्याची डरकाळीही ऐकू शकता.

फक्त पाहताच नाही तर त्याच्यासोबत फोटोही काढता येतो. त्यासाठी  'View in your space' असाही एक पर्याय दिला आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा 'the ground' ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला घरात कोणत्याही ठिकाणचा फोटो काढताना तो प्राणी दिसेल. तेव्हा घरात कुठेही तो प्राणी तुम्ही सेट करून फोटो काढू शकता.

हे वाचा : इंटरनेट डेटा लगेच संपतोय का? मोबाइलवर वापरा 'या' ट्रिक्स

फक्त वाघच नाही तर इतरही अनेक प्राणी आहेत ज्यांचे 3D होलोग्राम गुगलवर आहेत. यात Lion, Tiger, Bear,  Alpine Goat, Timberwolf, European hedgehog, Angler fish, Emperor penguin यांचा समावेश आहे.

हे वाचा : जिओच्या ग्राहकांसाठी 498 रुपयांचा रिचार्ज फ्री? व्हायरल होतोय मेसेज

First published: March 28, 2020, 5:57 PM IST

ताज्या बातम्या