मुंबई, 20 जुलै : Herd Immunity किंवा समूह प्रतिकारशक्तीबाबत काही देशांमधून बातम्या येत होत्या. अनेक लोकांना एखाद्या विषाणूची लागण झाली तर आपोआप त्याविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होते, असं एक गृहितक मांडलं जात होतं. आता मुंबईतसुद्धा Coronavirus विरोधात लढण्याची शक्ती आपोआप नागरिकांमध्ये निर्माण होते आहे का याविषयी चर्चा सुरू आहे. मुंबईतून खूप मोठा दिलासा देणारी आकडेवारी जाहीर झाली आहे. मुंबईत रुग्णवाढीचा दर आणखी कमी होऊन आता 1.21 टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ झाली आहे. धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात आणि झोपडपट्टीत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. मध्य मुंबईतही साथ आटोक्यात आहे. मुंबईतील रूग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता 1.21 % असा झाला आहे. काल हा 1.26% होता. मुंबईच्या 13 विभागात हा सरासरी दर 1.2% पेक्षा कमी आहे. या 13 पैकी 9 विभागात रुग्णवाढ 1% पेक्षाही कमी होते आहे. तर इतर 6 विभागातही हा सरासरी दर 1.4% पेक्षा कमी आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणखी वाढून आता 57 दिवसांवर पोहोचला आहे. काल हा कालावधी 55 दिवस होता. मुंबईजवळच्या ठाणे, कल्याण डोंबवली आदी उपनगरात मात्र रुग्णवाढ अजूनही झपाट्याने होते आहे. तिथे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 12 ते 20 दिवस असा आहे. महाराष्ट्रात इतरत्रही रुग्णवाढ मोठ्या प्रमाणावर होते आहे. महाराष्ट्रात आजही 8240 रुग्णांची उच्चांकी वाढ, 176 जणांचा मृत्यू यासंदर्भात दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या संचालकांनी खुलासा केला आहे. त्यांनी हर्ड इम्युनिटीचा थेट उल्लेख केलेला नसला, तरी दक्षिण आशियायी देशात कोरोनाविषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूदराबद्दल भाष्य केलं आहे.
There is not much evidence that there is community transmission happening at national level. But there are hotspots, even in cities where there is spike of cases & it very likely that local community transmission in those areas is happening: AIIMS Director Randeep Guleria pic.twitter.com/nC5QH3W6P7
— ANI (@ANI) July 20, 2020
भारतीयांमध्ये कोरोना विषाणूशी लढायची प्रतिकारशक्ती आपोआप निर्माण झालेली असू शतते. कारण Coronavirus मुळे होणारे मृत्यू तुलनात्मक कमी झाले आहेत. असं AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादमध्ये कोरोनाव्हायरच्या नवीन रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे, हेही त्यांनी नमूद केलं. देशातल्या काही भागात संसर्ग पसरायचा वेगही कमी आहे. म्हणजेच तिथल्या लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे, असं म्हणता येईल. आता खरोखरच देशात या साथीचा कहर झालाय का आणि आता तरी आलेख सर्वोच्च टोकावर (peak) आहे असं म्हणता येईल का? (Covid pandemic peak) याबद्दल विचारलं असता अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मुंबई, अहमदाबादमध्ये हे टोक येऊन गेलंय असं म्हणायला वाव असल्याचं सांगितलं. लस कधी येणार, किती परिणाम राहणार? भारत कोविडवरची लस शोधत आहे, ही चांगली गोष्ट आहे. भारतासारखा देश लशीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यास सक्षम आहे. निर्माण होणारी लस किमान एक ते दोन वर्षं रोगापासून संरक्षण देईल. पण सुरुवातीला लस कुणाला द्यायची याचा प्राधान्यक्रम ठरवायला हवा. वृद्ध व्यक्ती आणि इतर गंभीर आजार असणाऱ्या (Comorbid) व्यक्तींना प्राधान्याने लशीचे डोस द्यायला हवेत, असं मत डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केलं.