एका दिवसात 1258 लोकांचा मृत्यू, तरी अमेरिकेसाठी का आहे ही दिलासादायक बातमी?

एका दिवसात 1258 लोकांचा मृत्यू, तरी अमेरिकेसाठी का आहे ही दिलासादायक बातमी?

तब्बल तीन आठवड्यानंतर अमेरिकेला दिलासा मिळाला आहे. पहिल्यांदाच गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 25 एप्रिल : कोरोना विषाणूंशी लढणार्‍या जगासाठी एक चांगली बातमी आली आहे. तब्बल तीन आठवड्यानंतर अमेरिकेला दिलासा मिळाला आहे. पहिल्यांदाच गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. कोरोनामुळे जगभरात होणाऱ्या मृतांच्या आकड्यावर नजर टाकल्यास संस्था जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील अधिका-यांनी म्हटले आहे की, शुक्रवारी गेल्या 24 तासांत अमेरिकेत मृतांचा आकडा 1258 झाला आहे. ही आकडेवारी गेल्या तीन आठवड्यांतील सर्वात कमी आहे.

युरोप आणि अमेरिकेत सध्या कोरोनाचा प्रसार अधिक होत असला तरी, हळुहळु प्रसार कमी होत असल्याचेही म्हंटले जात आहे. जगभरात सध्या 27 लाख 90 हजार 986 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 1 लाख 95 हजार 920 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेत 9 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 52 हजार 296 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1 लाख लोकं निरोगी झाले आहे.

वाचा-VIDEO : 'या' शहरात पडलाय मृतांचा खच, मशिदीच्या पार्किंगमध्ये अशी केली जातेय सोय

चीन नाही युरोपातून आला कोरोना?

दरम्यान, कोरोनामुळे सर्वाधिक त्रस्त झालेल्या न्यूयॉर्कचे राज्यपाल अँड्र्यू कुमो म्हणाले आहेत की संशोधनात असे दिसून येते की कोरोना हा विषाणू पहिल्यांदाच अमेरिकेत युरोपमधून आला चीनमधून नाही. ते म्हणाले की अध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेली प्रवासी बंदी हा उशीरा घेतलेला निर्णय होता आणि कोरोना येथे होणारे संक्रमण थांबण्याची शक्यता नव्हती. नॉर्थईस्टर्न विद्यापीठाच्या संशोधनाचे हवाला देताना अँड्र्यू कुमो म्हणाले की 1 मार्च रोजी अमेरिकेत पहिल्यांदा कोरोना प्रकरणाची पुष्टी होईपर्यंत कोरोना विषाणू न्यूयॉर्कमधील सुमारे 10 हजार लोकांच्या शरीरात शिरला होता.

वाचा-लॉकडाऊनमुळे पायी घरी निघाली महिला रात्री शाळेत थांबली, नराधमांनी साधला डाव अन्..

ट्रम्प यांचा चीनवर आरोप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोनाच्या वाढत्या संसर्गासाठी चीनला जबाबदार ठरवत आहेत. गुरुवारी पत्रकार परिषदेत त्यांनी कोरोनाच्या माध्यमातून अमेरिकेवर हल्ला केल्याचे ते म्हणाले. ट्रम्पच नाही तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनीही आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘नोव्हेंबरपासून चीनला कोरोना विषाणूबद्दल माहिती होती. यामुळे पुन्हा एकदा ही बाब दृढ झाली आहे की व्हायरस विषयी माहिती देण्यास चीन पारदर्शक नव्हता.’

वाचा-मुंबईत 'आयसोलेशन सेंटर'साठी या संस्थेने आधी दिला होकार आता ऐनवेळी...

संपादन, संकलन-प्रियांका गावडे.

First published: April 25, 2020, 9:29 AM IST

ताज्या बातम्या