लॉकडाऊनमुळे पायी घरी निघाली महिला रात्री शाळेत थांबली, तोच नराधमांनी साधला डाव अन्...

लॉकडाऊनमुळे पायी घरी निघाली महिला रात्री शाळेत थांबली, तोच नराधमांनी साधला डाव अन्...

रात्री दोन वाजता महिलेला एकटे पाहिल्यानंतर तीन नराधम तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

  • Share this:

सवाईमाधोपूर, 25 एप्रिल : जगभर कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. अशात या संसर्गजन्य रोगाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पण यामध्येसुद्धा महिला अत्याचार काही कमी होताना दिसत नाही. महिला अत्याचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेली महिला घरी परतत असताना अंधाराचा फायदा घेत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला लॉकडाऊनमुळे अडकली होती. पण ती गुरुवारी जयपूरला रवाना झाली. वाटेत अंधार असताना ती एका शाळेत थांबली. जेथे रात्री दोन वाजता महिलेला एकटे पाहिल्यानंतर तीन नराधम तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. शुक्रवारी बलात्कार पीडितेने पोलीस स्टेशन गाठून अहवाल दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात सामील झालेल्या तिन्ही आरोपींना अटक केली.

एसपी सुधीर चौधरी यांनी सांगितलं की, अजमेर जिल्ह्यातील किशनगड पोलीस स्टेशन भागात राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेने शुक्रवारी बटोदा पोलीस स्टेशन, सवाईमाधोपुर इथे गुन्हा दाखल केला होता. त्यात तिने सांगितले की, लॉकडाऊनमुळे ती एका महिन्यापासून सवाईमाधोपूर जिल्ह्यात अडकली होती. गुरुवारी ती जयपूरकडे पायी निघाली. वाटेत भटकंतीमुळे तिने गाव बर्राखंडी गाठले. रात्री ती गावातील एका शाळेत थांबली.

एसपीने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी अडीचच्या सुमारास कमल खरवाल, लखन रागर आणि रिषिकेश मीना हे तिन्ही आरोपी शाळेत पोहोचले. पीडितेने महिलेला एकटे पाहिले आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून तेथून पळून गेले. घटनेनंतर पीडितेने बटोदा पोलीस स्टेशन गाठले. यानंतर ठाणेप्रभारी सीताराम मीणा यांच्या नेतृत्वात गठित पथकाने या सामूहिक बलात्कारात सहभागी असलेल्या तिन्ही आरोपींना अटक केली.

First published: April 25, 2020, 8:06 AM IST
Tags:

ताज्या बातम्या