जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / कोरोना व्हायरसवर वॅक्सिन तयार करण्याला लोकांचा विरोध का? सेलिब्रिटींनीही केलंय समर्थन

कोरोना व्हायरसवर वॅक्सिन तयार करण्याला लोकांचा विरोध का? सेलिब्रिटींनीही केलंय समर्थन

कोरोना व्हायरसवर वॅक्सिन तयार करण्याला लोकांचा विरोध का? सेलिब्रिटींनीही केलंय समर्थन

कोरोनाला रोखण्यासाठी एक प्रभावी लस आवश्यक आहे. मात्र याला विरोध करणाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 15 मे : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. यावर उपचारासाठी औषध आणि लस शोधण्याचं काम युद्घ पातळीवर सुरू आहे. यासाठी किमान एक वर्ष लागेल तसंच 20 माणसांवर चाचणी घेतली जाण्याची शक्यता आहे. जगभरात वॅक्सिनची वाट बघितली जात असताना याला विरोध करणारे काही लोक आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक माइक रेयान यांनी 13 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषेदत सांगितलं की, कोरोनाला रोखण्यासाठी एक प्रभावी लस आवश्यक आहे. मात्र याला विरोध करणाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे. अमेरिकन वेबसाइट बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार जगातील 10 टक्के लोक वॅक्सिनशिवाय कोरोनाशी लढण्यास तयार आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी शरीरात हर्ड इम्युनिटी त्यांना तयार करायची आहे. हर्ड इम्युनिटी तयार होण्यास चार ते पाच वर्षे लागू शकतात. यासाठी मोठ्या संख्येनं कोरोनाबाधित आजुबाजूला असावे लागतात. वॅक्सिनशिवाय हर्ड इम्युनिटीचा प्रयोग धोकादायक असून त्यामुळे लाखो लोकांचा जीव जावू शकतो. प्रोफेसर एमिली यांनी सांगितलं की, वॅक्सिनची गरज फक्त आतापुरती नाही. जर हा व्हायरस गेला नाही तर पुढच्या पिढ्यांसाठी वॅक्सिनची गरज असेल. जगात कोरोनावर औषध निघावं म्हणून लोक आशेने बघत असताना याला काहीजण विरोध करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, वॅक्सिन आजारावर काम करत नाही तर लोकांना आणखी आजारी पाडतं. हा सरकारी योजनेचा एक भाग असल्याचंही ते म्हणतात. हे वाचा : लेकीसाठी कायपण! लॉकडाऊनमध्ये नाराज झालेल्या मुलीसाठी बापानं काय केलं पाहा अमेरिकेत वॅक्सिनच्या विरोधात लोक आंदोलन करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, वॅक्सिन घ्यायचं की नाही याचा निर्णय लोकांना घेऊ द्या. वॅक्सिन बंधनकारक कऱण्याच्या निर्णयाविरोधात एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे. यावर 14 मेपर्यंत जवळपास 3 लाख 76 हजार सह्या करण्यात आल्या आहेत. हे वाचा : लॉकडाऊनमध्येही सायबर क्राईम सुरूच, आतापर्यंत झाली ‘एवढ्या’ गुन्ह्यांची नोंद वॅक्सिनच्या विरोधात बडे स्टारही पुढे आले आहेत. ब्रिटीश गायिका आणि रॅपर M.I.A. हिने एक ट्विट करून म्हटलं होतं की, कोरोना व्हायरसवर लस घेण्याऐवजी मरणं पसंद करेन. टेनिस स्टार नोव्हाक जोकोविच, गायक लॉरेन जोरेगुईसह अनेकांनी वॅक्सिनच्या विरोधाचं समर्थन केलं आहे. वॅक्सिन बंधनकारक करण्याला त्यांचा विरोध आहे. हे वाचा : Lockdown मुळे गेली नोकरी, फळे आणि भाजीपाला विकून उदरनिर्वाह करतोय ग्रॅज्युएट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात