Home /News /videsh /

Corona समोर ढाल बनून उभी राहिली महिला डॉक्टर, जिनं संपूर्ण देशाचं व्हायरसपासून केलं रक्षण

Corona समोर ढाल बनून उभी राहिली महिला डॉक्टर, जिनं संपूर्ण देशाचं व्हायरसपासून केलं रक्षण

दक्षिण कोरिया (South korea) डॉ. जेऑंग कियोंग यांच्या रणनीतीनुसार कोरोनाव्हायरसशी (Coronavirus) लढा देत आहेत.

    सियोल, 25 मार्च : चीननंतर (china) कोरोनाव्हायरसने (coronavirus) दक्षिण कोरियाला (south korea) आपल्या विळख्यात गेतलं. दक्षिण कोरियात कोरोनाव्हायरसचं पहिलं प्रकरण 4 फेब्रुवारीला समोर आलं. यानंतर 10 दिवसांत कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या तिप्पट झाली. रुग्णांची संख्या पाहता दक्षिण कोरियामध्ये हा व्हायरस सर्वात जास्त धुमाकूळ घालेल असं वाटलं होतं. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दक्षिण कोरिया कोरोनाव्हायरसविरोधातील लढाईत 2 पावलं पुढे आहे आणि यांचं संपूर्ण श्रेय जातं ते एका एका महिला डॉक्टरला (lady doctor) फॅमिली डॉक्टर  म्हणून काम केलेल्या डॉ. जेऑंग कियोंग या कोरोनाव्हायरस आणि दक्षिण कोरियाच्या मध्ये ढाल बनून उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या रणनीतीने दक्षिण कोरियाला या व्हायरसच्या विळख्यातून सोडवलं. आता देशातील नव्या कोरोनाग्रस्तांची प्रकरणं कमी झालीत, शिवाय रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. हे वाचा - 'आता पोट भरण्यापेक्षा शहर वाचवणं महत्त्वाचं’; कोरोनाशी लढण्यासाठी ऑटो घेऊन सुसाट निघाला ड्रायव्हर दक्षिण कोरियामध्ये एका धार्मिक कार्यक्रमात कोरोनाव्हायरस पसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर कोरियाई सेंटर्स फॉर डिसीज अँड पब्लिक कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (KCDC) च्या प्रमुख डॉ. जेआँग यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 2.12 लाख लोकांची माहिती करण्याचे निर्देश दिलेत आणि प्रत्येकाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. डॉ. जेऑंग यांच्या रणनीतीनुसार दक्षिण कोरियामध्ये कोरोनाव्हायरसच्या वैद्यकीय चाचणीसाठी जागोजागी टेलिफोन बूथच्या आकाराचे छोटे छोटे टेस्टिंग सेंटर्स बनवले. या सेंटर्सवर दरदिवशी 20,000 लोकांची मोफत कोरोना चाचणी केली जाते आहे. या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांना लगेच आयसोलेट करून त्यांच्यावर उपचार सुरू केले जातात. याच मेडिकल टेस्टलाच दक्षिण कोरियात कोरोनाव्हायरस पसरण्यापासून रोखण्यासाठी हत्यार मानलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, (WHO) आतापर्यंत  188 देश कोरोनाव्हायरसच्या विळख्यात सापडलेत. या व्हायरसच्या लढाईत दक्षिण कोरिया 2 पावलं पुढे आहे. आठवडाभरापूर्वी कोरोनाव्हायरसच्या संक्रमणात चीन, इटलीनंतर दक्षिण कोरियाचा क्रमांक होता मात्र तिथली परिस्थिती आता सुधारते आहे. या आठवड्यात दक्षिण कोरियातील मृत्यूदर 0.97 टक्के आहे. इटलीमध्ये 7.94 आणि चीन, हाँगकाँगमध्ये 3.98 आहे. हे वाचा - एक नंबर! तब्बल 1 लाख लोकांनी कोरोनावर केली मात, निरोगी होऊन परतले घरी जागतिक आरोग्य संघटनेच्या रिसर्च पॉलिसीचे माजी संचालक तिक्की पंगेस्तू यांनी सांगितलं की, "अमेरिका आणि ब्रिटनकडे चीननंतर 2 महिने होते. मात्र त्यांना वाटलं आपल्याकडे काही होणार नाही. अमेरिकेने चाचणी करण्यात उशीर केला. तर दुसरीकडे व्हायरसबाबत पुरेशी माहिती नसतानाही सिंगापूर, तैवान, हाँगकाँगमध्ये स्क्रिनिंग सुरू केली. मात्र ज्या संक्रमित लोकांमध्ये लक्षण दिसली नाहीत, तेदेखील संक्रमण पसरवत होते हे नंतर दिसून आलं" अशावेळी थेट कोरोना टेस्ट, संक्रमित लोकांना वेगळं ठेवणं आणि सोशल डिस्टेंसिंग खूप महत्त्वाचं आहे, असं जगभरातील आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे आणि याच रणनीतीचा डॉ. जेआँग यांनी अवलंब केला, ज्याचा परिणाम आज दक्षिण कोरियात दिसत आहे. डॉ. जेआँग सोलमध्ये फॅमिली डॉक्टर म्हणून काम करत होत्या. त्यानंतर 1995 मध्ये राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयात नियुक्ती झाली. स्वाइन फ्लू संक्रमणादरम्यान  2009 मध्ये त्यांना इमर्जन्सी केअर डिपार्टमेंटची जबाबदारी देण्यात आली. सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन आणि डिपार्टमेंट ऑफ क्रोनिक डिसीज कंट्रोल रिसर्चच्या त्या संचालक होत्या. त्यानंतर 2017 मध्ये त्यांना कोरियाई सेंटर्स फॉर डिसीज अँड पब्लिक कंट्रोल अँड प्रिव्हेंशनची (KCDC) जबाबदारी सोपवण्यात आली. केसीडीसीच्या त्या पहिल्या महिला संचालिका आहेत. सीडीसीच्या माजी संचालकांच्या मते, "अशा परिस्थितीत दुसरी कोणतीच व्यक्ती डॉ. जेआँग यांच्यापेक्षा चांगलं काम करू शकत नाही. हे काम फक्त माहितीवरून करू शकत नाही. डॉ. जेआँग यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. त्यांना माहिती आहे, अशा परिस्थितीत काय करावं आणि काय नाही" हे वाचा - 90 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवलं, 25 दिवस लढा देऊन परतल्या घरी इंटरशनल वॅक्सिन इन्स्टिट्युट (IVI) चे महासंचालक जेरॉम किम यांच्या मते, "दक्षिण कोरियाने औषध किंवा लस बनवण्यात वेळ न घालवता मेडिकल टेस्ट आणि संक्रमित लोकांना ोळखून त्यांना वेगळं ठेवण्यावर भर दिला. बायोटेक कंपन्यांनी दिवसरात्र करून टेस्ट किट बनवल्या, ज्यामुळे आज देशात दरदिवशी 20,000 लोकांची कोरोना टेस्ट होऊ शकते."
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या