Coronavirus : एका फूटबॉल मॅचने घेतला 8 हजार लोकांचा जीव, इटलीतील वैज्ञानिकांचा दावा

Coronavirus : एका फूटबॉल मॅचने घेतला 8 हजार लोकांचा जीव, इटलीतील वैज्ञानिकांचा दावा

सध्या इटली आणि स्पेन या दोन्ही देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 70 हजारहून अधिक झाली आहे. तर इटलीमध्ये तब्बल 8 हजार आणि स्पेनमध्ये 4 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मिलान, 27 मार्च : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत 24 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यात इटलीमध्ये मृतांची संख्या सर्वात जास्त आहे. इटलीमध्ये या व्हायरसने तब्बल 8 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनपेक्षाही मृतांचा आकडा इटलीमध्ये जास्त आहे. दरम्यान इटलीमध्ये कोरोनाची सुरुवात कोठून झाली, याबाबत अद्याप काही माहिती नाही आहे. मात्र इटलीच्या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, एका फूटबॉल मॅचमुळे येथे कोरोना पसरला.

वॉशिंग्टन पोस्टमध्ये आलेल्या वृत्तानुसार इटलीतील शास्त्रज्ञ फ्रान्सिस्को ली फॉक्के यांनी, कोरोना पसरण्याला चॅम्पियन्स लीग या फूटबॉल स्पर्धेला कारणीभूत ठरवले आहे. इटलीच्या मिलान येथील सॅन सिरो स्टेडियमवर 19 फेब्रुवारी 2020 रोजी अटलांटा आणि वलेन्सिया यांच्यात सामना झाला होता. हा सामना पाहण्यासाठी 44 हजारहून अधिल लोकं उपस्थित होते. यामध्ये ब्रिटिश चाहत्यांची संख्या जास्त होती. दरम्यान, या सामन्यानंतर दोन दिवसांनी इटलीमध्ये कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला. इतकेच नाही तर सामन्यांच्या 2 आठवड्यांत बर्गमोमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या सर्वात जास्त प्रमाणात वाढली.

दिवसभरात 15, एकूण 77 : वुहानसारखं मुंबई होणार देशातलं कोरोनाव्हायरसचं केंद्र?

सध्या इटली आणि स्पेन या दोन्ही देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 70 हजारहून अधिक झाली आहे. तर इटलीमध्ये तब्बल 8 हजार आणि स्पेनमध्ये 4 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चॅम्पियन लीग सामना झालेल्या शहरात 3500 करोनाग्रस्त रुग्ण आहेत. अलीकडे युरोपमध्ये मोठ्या गतीने कोरोना पसरत आहे. चॅम्पियन्स लीगमधील या सामन्यानंतर 4 दिवसांनी बर्गमोच्या आसपासचा परिसर लॉक डाऊन करण्यात आला.

फूटबॉल मॅचमुळेच पसरला कोरोना

वैज्ञानिक ली फौके यांनी, ज्यावेळी सामना झाला त्यावेळी विषाणूबाबत अनिश्चितता होती. आज आपल्याला माहित आहे. मात्र इटलीमध्ये लोकांनी विषाणूच्या संभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष केले. हा सामना झाला नसता तर 4-5 हजार लोकांचा जीव वाचला असतात. मात्र या सामन्यादरम्यान खेळाडू आणि प्रेक्षक एकमेकांच्या संपर्कात आले. त्याचा फटका बसला.

इटली कोरोनाचा हाहाकार

इटली आणि स्पेनमध्ये कोरोना विषाणूने कहर माजला आहे. केवळ इटलीमध्ये 6,135 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. कोरोनाने जागतिक पातळीवर 5 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. वॉशिंग्टनमधील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार इटलीमध्ये संसर्गाची 6,153 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. अशाप्रकारे, आता इटलीमध्ये 80,539 प्रकरणे नोंदली गेली आहेत. संक्रमित लोकांची संख्या ही चीनच्या बरोबरीची झाली आहे.

VIDEO : ...म्हणून चीन Coronavirus ला हरवू शकला; लॉकडाउनमधलं वुहान कसं होतं पाहा

First published: March 27, 2020, 9:46 AM IST

ताज्या बातम्या