Home /News /videsh /

परग्रहांवरून पृथ्वीवर येऊ शकतो नवा व्हायरस, तज्ज्ञांनी केलं सावध

परग्रहांवरून पृथ्वीवर येऊ शकतो नवा व्हायरस, तज्ज्ञांनी केलं सावध

परग्रहांवरील व्हायरसच्या धोक्याची शक्यता पाहता, planetary protection ची गरज आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

    कॅलिफोर्निया, 12 मे : कोरोनाव्हायरस पसरू नये, यासाठी जसं आता इतर देशातून आलेल्या लोकांना क्वारंटाइन केलं जातं, वस्तू डिसइन्फेक्ट केल्या जात आहेत तसंच जर दुसऱ्या ग्रहावर जाणारे रॉकेट्स आणि अंतराळवीरांच्या बाबतीतही झालं तर...परग्रहावरील एखाद्या नमुन्यातून पृथ्वीवर व्हायरस आला, रॉकेट्स डिसइन्फेक्ट करण्यात आले आणि अंतराळवीरांना क्वारंटाइन करण्यात आलं... हे एखाद्या फिल्मी कथेप्रमाणे तुम्हाला वाटेल. मात्र पृथ्वीवरील सध्याचा कोरोनाव्हायरसचा धोका पाहता परग्रहांवरही असे व्हायरस असावेत आणि तिथल्या नमुन्यांमार्फत पृथ्वीवर हे व्हायरस येऊ शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. हे वाचा - आईचं दूध कोरोनाव्हायरसपासून संरक्षण देऊ शकतं का? स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक स्कॉट हबार्ड यांनी सांगितलं की, "सध्या आपण एका अदृश्य महासाथीशी लढत आहोत आणि भविष्यातही अशा समस्यांशी आपल्याला सामना करावा लागू शकतो. परग्रहांवरूनही व्हायरस येऊ शकतात. मंगळ ग्रहावरील दगडं लाखो वर्षे जुनी आहेत. माझ्या माहितीनुसार तिथं सक्रिय जीव असू शकतात, जे पृथ्वीवर आल्यानंत व्हायरसच्या रुपात पसरू शकतात" "त्यामुळे प्लनेटरी प्रोटेक्शन (planetary protection) घेण्याची गरज आहे. मंगळ ग्रहांवरून पृथ्वीवर आणले जाणारे आणण्यात येणारे मातीचे नमुने म्हणजे एखाद्या धोकादायक व्हायरसला आमंत्रण असू शकतात. त्यामुळे ते सुरक्षित असल्याचं सिद्ध होत नाहीत तोपर्यंत एखाद्या व्हायरसप्रमाणेच त्यांच्यावर काम व्हावं. शिवाय  अंतराळ मोहिमेत वापरण्यात येणारे रॉकेट्स आणि इतर उपकरणंही डिसइन्फेक्ट करावीत. तसंच अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांनाही क्वारंटाइन केलं जावं, जसं पहिल्या चंद्र मोहिमेवर पाठवण्यात आलेल्या अपोला यांना करण्यात आलं होतं", असंही स्कॉट हबार्ड म्हणालेत. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Nasa, Virus

    पुढील बातम्या