आईचं दूध कोरोनाव्हायरसपासून संरक्षण देऊ शकतं का?

आईचं दूध कोरोनाव्हायरसपासून संरक्षण देऊ शकतं का?

कोरोनाग्रस्त महिलेच्या दुधातही कोरोनाव्हायरशी लढणाऱ्या अँटिबॉडीज (antibodies in milk) असू शकतात, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे : कोरोनावर मात केलेल्या रुग्णाचं रक्त वापरून म्हणजे प्लाझ्मा थेरेपीनं कोरोना रुग्णाला बरं करता येऊ शकतं, याबाबत सध्या ट्रायल सुरू आहे. मात्र आईचं दूध (mother milk) जे बाळाचं अनेक आजारांपासून संरक्षण करतं, त्यावर फारसं लक्ष दिलं जात नाही आहे. मात्र अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी आता त्या दिशेनं अभ्यास करायला सुरुवात केली आहे.

न्यूयॉर्कमधील माऊन सिनाईतील Icahn School of Medicine च्या रुबेका पॉवेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा अभ्यास केला. जो medRxiv प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र अद्याप मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध नाही.  त्यानुसार कोरोनाग्रस्त महिलेच्या दुधातही अशा अँटिबॉडीज (antibodies in milk) असू शकतात, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

हे वाचा - प्रेग्नन्सीत 'कोरोना' झाल्यास बाळालाही व्हायरसची लागण होते का?

शास्त्रज्ञांनी कोरोनाग्रस्त आणि कोरोना नेगेटिव्ह महिलांच्या दुधाचे नमुने घेतले आणि त्यांचा अभ्यास केला. याचे सुरुवातीचे निकाल खूपच सकारात्मक असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

रॉयटर्सशी बोलताना डॉ. रेबिका पॉवेल यांनी सांगितलं की, "कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या आणि बाळाला स्तनपान करत असणाऱ्या महिलांनी बाळाला स्तनपान करणं थांबवू नये, त्यांनी बाळाला स्तनपान करत राहावं. दुधामार्फत बाळाला व्हायरसची लागण होत नाही, असं इतर अभ्यासांमध्ये दिसून आलं आहे. शिवाय दुधामध्ये अशा अँटिबॉडीज असतात, जे बाळाला इन्फेक्शनपासून संरक्षण देतात हे आम्हाला दिसून आलं आहे"

हे वाचा - कोरोनाग्रस्त आईने Breasfeeding केल्याने बाळाला व्हायरसचा धोका असतो का?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, "कोरोनाग्रस्त महिलेनं बाळाला स्तनपान केल्याने आतापर्यंत कोणताही धोका दिसलेला नाही. ज्या महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करायचं आहे त्यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता स्तनपान करावं. मात्र खबरदारी अवश्य घ्यावी"

आता शास्त्रज्ञ आईच्या दुधातील अँटिबॉडीमार्फत कोरोनाव्हायरसवर उपचार करता येऊ शकतात का या दिशेनं अभ्यास करण्याचा प्रयत्न आहे आणि तसं झालं तर अमृत समजलं जाणारं आईचं दूध हे महाभयंकर कोरोनाव्हायरसपासून प्रत्येकाला वाचवू शकेल.

लहान मुलांमध्ये कोरोनाव्हायरसची वेगळी लक्षणं?

सुरुवातीला कोरोनाव्हायरसचा धोका हा वयस्कर व्यक्ती, इतर आजार असलेल्या व्यक्तींना जास्त असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता न्यूयॉर्क, यूके, फ्रान्स, इटली, स्पेन या देशांमध्ये लहान मुलांमध्ये वेगळी लक्षणं दिसून आलीत. डॉक्टरांनी ही लक्षणं एखाद्या वेगळ्या आजाराची, नव्या व्हायरसची किंवा लहान मुलांमध्ये ही कोरोनाव्हायरसची नवीन लक्षणं असू शकतात असंही म्हटलं आहे. याबाबत सध्या अधिक अभ्यास सुरू आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - निळे ओठ, पिवळं शरीर... चिमुकल्यांमध्ये कोरोनाची वेगळी लक्षणं की नव्या व्हायरसचं संकट?

First published: May 10, 2020, 8:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading