न्यूयॉर्क, 24 मे : आतापर्यंत लहान मुलांमध्ये दिसून येणारा कावासाकी (kawasaki) हा आजार आता तरुणांनाही आपला शिकार बनवू लागला आहे. कॅलिफॉर्निया आणि न्यूयॉर्कमध्ये 6 तरुणांना या आजाराची लागण झाली आहे, या सर्वांचं वय विशीच्या आसपासच आहे. सामान्यपणे लहान मुलांना होणारा हा आजार आता मोठ्या माणसांनाही होऊ लागला आहे. द सन च्या रिपोर्टनुसार, लहान मुलांना कावासाकी आजाराचा धोका आहे, असं आतापर्यंत सांगितलं जात होतं. मात्र आता मोठ्या व्यक्तींनाही या आजाराचा तितकाच धोका आहे. हा आजारा कोरोनाव्हायरसशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं आहे. न्यूयॉर्क शहरातील लहान मुलांच्या डॉक्टर जेनीफर लाइटर यांनी सांगितलं की, लहान मुलांइतकाच मोठ्या माणसांनाही कावासाकीसारख्या आजाराचा धोका आहे. या आजारात ताप येतो. शरीरावर लाल चकत्या येतात, घसा कोरडा पडू लागतो आणि अति गंभीर परिस्थितीत छातीत जळजळ होते. हे वाचा - राजावाडी हॉस्पिटलमधील धक्कादायक VIDEO! जनरल वॉर्डमध्ये कोरोना मृतदेह पडून डॉ. लाइटर यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितलं की, किशोरवयीन आणि तरुणांमध्येही या आजाराची लक्षणं आहेत. या लोकांच्या हार्ट आणि इतर अवयवांवर आजाराचा परिणाम जास्त दिसून येतो आहे. सॅन डियागोतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील कावासाकी डिसीज रिसर्च सेंटरचे प्रमुख डॉ. जेन बर्न्स यांनी सांगितलं की, कदाचित किशोरवयीन आणि तरुणांमध्ये या आजाराचं निदान झालं नसावं. बहुतेक डॉक्टरांनी कावासाकी आजाराच्या रुग्णांवर कधी उपचार केले नाहीत. अमेरिकेत कोरोना महासाथीनंतर या आजारानं लहान मुलांना आपलं शिकार बनवलं. हे वाचा - आठवडाभरात महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी रिपोर्टनुसार अमेरिकेतील 20 राज्यांमध्ये या आजाराची शेकडो प्रकरणं आहेत. फक्त न्यूयॉर्क शहरातच 147 मुलांना हा आजार झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







