आठवडाभरात महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी

आठवडाभरात महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी

महाराष्ट्रातही तापमान वाढणार असून विदर्भ आणि मराठवाडा होरपळून निघण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 24 मे : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील बर्‍याच भागात तीव्र उष्णता जाणवत आहे. उत्तर आणि मध्य भारतात महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि देशातील 9 राज्ये कडाक्याच्या उष्णतेखाली आहेत. बर्‍याच भागात दिवसाचं तापमान 40 ते 46 अंशांच्या आसपास नोंदवलं गेलं आहे. दिल्लीत उष्णतेचा पारा खाली येणाचं काही नाव घेत नाही. सतत गरम वारे वाहू लागले आहेत आणि आर्द्रता कायम आहे. दिल्लीचे तापमान 46 अंश सेल्सिअस ओलांडलं आहे.

देशात आठवडाभर आणखी तापमान वाढेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातही तापमान वाढणार असून विदर्भ आणि मराठवाडा होरपळून निघण्याची शक्यता आहे. शनिवारी नागपुरात 46.5 अंश सेल्सिअस तपमान नोंदलं गेलं, हे महाराष्ट्रातील सर्वात उष्ण तापमान आहे. विदर्भात सलग तीन दिवस नागपूरमध्ये सर्वाधिक उष्णता नोंदली गेली. यासह, शनिवारी पारा 46.5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला तेव्हा हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला.

उद्धव ठाकरे LIVE : धोका वाढणार, पण घाबरू नका; मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

त्यामुळे कधीही उष्णतेचा प्रकोप होऊ शकतो. म्हणून प्रशासनाला सावधगिरी बाळगण्यास सांगितलं जातं आहे. जास्तीत जास्त तापमानात 0.9 आणि किमान तापमानात 6 अंशांची वाढ झाल्याने दिवसा तसेच रात्रीही उष्णतेत वाढ झाली आहे. हवामान खात्याने 26 मेपर्यंत नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या वेगाची शक्यता वर्तविली असून त्यामुळे उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

15 जूनपासून राज्यात शाळा सुरू? शिक्षणमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

तापमानात सातत्याने वाढ झाल्यामुळे, उन्हाचा कडकडाटदेखील दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारीही अशीच परिस्थिती दिसून आली. हवामान खात्याने नागपूरव्यतिरिक्त विदर्भाच्या विविध जिल्ह्यांमध्येही उष्माघाताचा इशारा दिला आहे. या तापमानामुळे तब्येत बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळए नागरिकांनी काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये. कारण सध्याच्या वातावरणात प्रकृतीवर परिणाम होणं परवडणारं नाही. त्यामुळे सगळ्यांनीच खबरदारी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार मान्सून वेळेत केरळमध्ये येणार असल्याचं सांगितलं जात आहे. दक्षिण पश्चिम मान्सून अंदमान आणि केरळपासून दाखल होत मग पुढे उत्तर भारतात त्याचा प्रवास सुरु होतो. दक्षित पश्चिम मान्सून अंदमान समुद्रासह जवळपासच्या परिसरात दाखल झाला आहे. केरळमध्ये 5 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल तर महाराष्ट्रात 11 जूनपर्यंत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनचा सध्याचा प्रवास पाहता हवामान विभागाच्या अंदाजानुसार वेळेत दाखल होईल असं सांगण्यात येत आहे.

पहिल्यांदाच 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

केरळमध्ये मान्सून वेळेत दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनचं वेळेत आगमन होतं. त्यावर पिकांची पेरणी त्यावर अवलंबून असते. शेतकऱ्यांसह सर्वजण मान्सूनची चातकासारखी वाट पाहात असतात. हवामान खात्यानं 1961 ते 2019 दरम्यान 58 वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला. त्यानुसार परतीच्या प्रवासावर त्याचं आगमन आणि प्रवास यात गेल्या काही वर्षात सातत्यानं बदल होत आहेत.

पाकिस्तानातून भारतात येणार 300 नागरिक, अटारी बॉर्डवरून येणार मायदेशी

संपादन - रेणुका धायबर

First published: May 24, 2020, 3:14 PM IST

ताज्या बातम्या