Home /News /viral /

लेकीसाठी कायपण! लॉकडाऊनमध्ये नाराज झालेल्या मुलीसाठी बापानं काय केलं पाहा

लेकीसाठी कायपण! लॉकडाऊनमध्ये नाराज झालेल्या मुलीसाठी बापानं काय केलं पाहा

लॉकडाऊनमध्ये नाराज झालेल्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी वडिलांनी जे केलं त्याचं कौतुक आता जगभरात केलं जात आहे.

    वॉशिंग्टन, 15 मे : कोरोनामुळे जगात जवळपास सर्व काही ठप्प झालं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यास सांगण्यात येत आहे. महत्वाच्या कामाशिवाय लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. शाळा, कॉलेज, मॉल्ससुद्धा बंद आहेत. यातच एका विद्यार्थीनिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं पण ती नाराज होती. कारण लॉकडाऊनमुळे पदवीदान समारंभ होऊ शकला नाही. मात्र नाराज मुलीच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी बापानं एक युक्ती केली. अमेरिकेतील लुसियानात राहणाऱ्या गॅब्रियल हिने झेवियर विद्यापीठात चार वर्षे शिक्षण घेतलं. मात्र जेव्हा डिग्री मिळण्याची वेळ आली तेव्हा लॉकडाऊनमुळे कॉलेजमध्ये जाण्याची संधीच मिळाली नाही. पण गॅब्रियलचे वडील टोरेन्स बर्सन यांनी मात्र मुलीला नाराज होऊ दिलं नाही. मुलीच्या आनंदासाठी बापानं चक्क घराजवळच पदवीदान समारंभाचं आयोजन केलं. यावेळी सर्व काही अगदी विद्यापीठाच्या समारंभासारखं करण्याचा प्रयत्न वडिलांनी केला. सोशल मीडियावर या बापलेकीचं कौतुक होत आहे. काहींनी टोरेन्स यांना बेस्ट डॅड म्हटलं तर काहींनी मुलीला लकी म्हटलं आहे. हे वाचा : लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर आराम करत होता बिबट्या, नागरिकांची पळापळ
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या