देशांतर्गत 25 मेपासून विमानसेवा सुरू पण मुंबईसह महाराष्ट्रात संभ्रम कायम

देशांतर्गत 25 मेपासून विमानसेवा सुरू पण मुंबईसह महाराष्ट्रात संभ्रम कायम

ऑगस्टपर्यंत विमानसेवा सुरळीत सुरू करण्यात येईल असा विश्वास उड्डाण मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 मे : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्यात सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा प्रवाशांसाठी सुरू होत आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात अद्यापही संभ्रम कायम आहे. इथल्या नागरिकांना आणखीन 7 दिवस विमानातून प्रवास करण्यासाठी आणखीन 7 दिवस वाट पाहावी लागणारर असल्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे राज्य सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रातील विमानसेवा सोमवार सुरू करण्यास स्थगिती दिल्याची माहिती मिळाली आहे.

एअर इंडियासह अनेक विमान कंपन्यांनी सोमवारपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. विमान सेवा सुरू झाली तर किमान 27 हजार 500 प्रवासी रोज प्रवास करणारे असतील. अशा परिस्थितीत विमानतळ व विमान कंपनीतील कर्मचाऱ्यांची जास्त गरज भासणार आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी आणि सुरक्षितता हे सर्वात मोठं आव्हान असेल. त्यासोबतच राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतुकीला स्थगिती असल्यानं प्रवाशांचीही गैरसोय होईल असं कारणही केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे.

हे वाचा-VIDEO: ठाण्यातल्या क्वारंन्टाइन सेंटरची दुरावस्था, अस्वच्छता आणि असाह्य रुग्ण

राज्यातील विमान सेवा लवकरच सुरू करण्याठी प्रयत्नशील असल्याचंही सांगितलं आहे. ऑगस्टपर्यंत विमानसेवा सुरळीत सुरू करण्यावर भर देण्यात येईल असा विश्वास उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी शनिवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व्यक्त केला.

हे वाचा-POSITIVE NEWS : पुण्यातील कोरोना टेस्टिंग लॅबच्या बाबतीत सकारात्मक निर्णय!

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर 25 मार्चपासून भारतातील सर्व प्रवाशी उड्डाणे बंद ठेवण्यात आली होती. यापैकी काही राज्यांनीही सोमवारपासून विमान सेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांना मात्र विमान प्रवास करण्यासाठी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने शनिवारी संध्याकाळी पाठवलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 47190 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 3,48,026 जणांची COVID-19 ची चाचणी करण्यात आली आहे. राज्यभरात घरी विलगीकरणात असलेले (Home Quarantine) 4 लाख 85 हजार 323 जण आहेत तर 33545 लोकांना संस्थात्मक विलगीकरणात (Institutional Quaratine) ठेवण्यात आलं आहे.

हे वाचा-कोरोनाव्हायरसविरोधात कधी येणार औषध? भारतातील तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती

संपादन- क्रांती कानेटकर

Tags:
First Published: May 24, 2020 07:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading