वुहान, 24 मे : चीनच्या वुहानपासून कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. दरम्यान एकीकडे चीन कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर असतानाच पुन्हा व्हायरसनं शिरकाव केला. वुहानमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर चीननं तब्बल 1 कोटी 47 लाख लोकांची चाचणी केल्याचा दावा केला आहे. ही माहिती खरी असल्यास हा एक प्रकारचा रेकॉर्ड असेल. आतापर्यंत एकाही देशाला अशी कामगिरी करता आलेली नाही आहे.
रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक आयोग्य विभागानं शनिवारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी येथे 10 लाख चाचण्या करण्यात आल्या. तर एकूण 1 कोटी 47 लाख लोकांची चाचणी करण्यात आली आहे. आतापर्यंत एकाही देशाला एवढ्या मोठ्या संख्येनं चाचण्या करता आल्या नाही आहेत. याआधी जगात सगळ्यात आधी वुहानमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र कोरोनाचे एकही नवीन प्रकरण न सापडल्यानंतर वुहाननं तब्बल 76 दिवसांनी लॉकडाऊन हटवला. मात्र आता पुन्हा कोरोनानं वुहानमध्ये प्रवेश केला आहे. एवढंच नाही तर वुहानमध्ये पुन्हा एकदा क्लस्टर ट्रान्समिशन दिसून आलं आहे. त्यामुळं वुहानमधील सर्व लोकांची कोरोना चाचणी केली जाणार होती.
वाचा-ऑटो, टॅक्सीवर बंदी; तर आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकर प्रवास कसा करतील?
वुहानमध्ये एका दिवसात 14.7 लाख लोकांची Nucleic Acid टेस्ट झाली. लॉकडाऊन हटवल्यानंतर वुहानमध्ये 14 मेपर्यंत अशा लोकांची चाचणी करण्यात आली, ज्यांमध्ये कोणतीही लक्षणं नव्हती. वुहानपासून कोरोनाची सुरुवात झाली. चीनच्या अधिकृत आकड्यांनुसार देशात 84 हजार कोरोनाबाधित आहे. तर 4 हजार 600 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान वुहानमध्ये आता परिस्थिती चांगली असून रशियाच्या सीमेवर असलेल्या शुलान शहरात (Shulan City) क्लस्टर स्वरूपाचे कोरोना संक्रमण होत असल्याचं समोर आलं आहे.
वाचा-15 जूनपासून राज्यात शाळा सुरू? शिक्षणमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेतवुहानमध्ये सर्वात आधी जाहीर केला लॉकडाऊन
चीनमध्ये सर्वात आधी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. हा लॉकडाऊन हुबई प्रांतातील वुहान या शहरात पहिल्यांदा लागू करण्यात आला. याचे कारण म्हणजे कोरोनाची सुरुवात या शहरातून झाली. मार्च अखेरीस वुहानमधील लॉकडाऊन शिथिल करण्यात आला.
वाचा-पहिल्यांदाच 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी समोर
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.