ऑटो, टॅक्सीवर बंदी; तर आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकर प्रवास कसा करतील?

ऑटो, टॅक्सीवर बंदी; तर आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकर प्रवास कसा करतील?

मुंबईत रेल्वे, मेट्रो पूर्णपणे बंद आहेत. बेस्ट बसमध्ये सामान्य लोकांवर निर्बंध असतात. अशा परिस्थितीत सरकारनं मुंबईतील ऑटो किंवा टॅक्सीवर बंदी घातली आहे.

  • Share this:

मुंबई, 24 मे : मुंबईत प्रत्येक क्षणी कायदा बनविला जातो आणि दुसऱ्या सेकंदात दुसरा बदलला जातो. महाराष्ट्र शासनाने कोरोना अंतर्गत जारी दिलेल्या आदेशात ऑटो आणि टॅक्सीवर बंदी घातली आहे. ऑटो टॅक्सीवर बंदी, मग आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकर प्रवास कसा करतील? हा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईत रेल्वे, मेट्रो पूर्णपणे बंद आहेत. बेस्ट बसमध्ये सामान्य लोकांवर निर्बंध असतात. अशा परिस्थितीत सरकारनं मुंबईतील ऑटो किंवा टॅक्सीवर बंदी घातली आहे. जी सर्वसामान्यांसाठी आहे. आज प्रत्येक नागरिकांकडे खासगी मोटारी नसतात असे सांगत अनिल गलगली म्हणाले की, जर एखाद्याला रुग्णालयात जायचं असेल तर सामान्य नागरिकांना कोणते पर्याय उपलब्ध आहेत? आपत्कालीन परिस्थितीत सामान्यांसाठी प्रवास करण्यासाठी सरकारने आतापर्यंत कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही.

15 जूनपासून राज्यात शाळा सुरू? शिक्षणमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

आदेशानुसार नमूद असलेली ऑटो आणि टॅक्सीवरील बंदी हटवण्यात यावी, असा विश्वास अनिल गलगली यांनी व्यक्त केला. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजय मेहता आणि परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे यावर आता राज्य सरकार विचार करतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

पहिल्यांदाच 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

एकीकडे रेड झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्याच गोष्टींवर बंदी आहे. त्यात केंद्र सरकारने जारी केलेल्या देशांतर्गत विमानसेवेलाही राज्य सरकारकडून विरोध करण्यात आला आहे. 25 मेपासून देशांतर्गत उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत, परंतु महाराष्ट्र सरकारनं यासाठी असमर्थता दाखवली आहे. 25 मेपासून विमानसेवा सुरू करू शकत नाहीत अशी महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. शनिवारी त्यांनी तसं कारणही केंद्र सरकारला दिलं आहे. महत्वाच्या शहरांमध्ये मुंबई आणि पुणे रेड झोन आणि या शहरांमधील रहदारी आणि लोकांच्या वाहतुकीवर पूर्णपणे बंदी आहे. अशा परिस्थितीत, विमानसेवा आता सुरू करू शकत नाही असं राज्यानं म्हटलं आहे.

पहिलं कोरोना वॅक्सिन ज्याचं 100 रुग्णांवर झालं ट्रायल, वाचा काय आला रिझल्ट

संपादन - रेणुका धायबर

First published: May 24, 2020, 12:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading