माद्रिद, 17 एप्रिल : स्पेन हा जगातील दुसरा देश आहे जिथं कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. स्पेनमध्ये आतापर्यंत 1 लाख 85 हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर या विषाणूमुळे 19 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. स्पेनमध्ये या संसर्गामुळे दररोज 500 हून अधिक लोक मरण पावत आहेत, ज्यात देशातील सर्व भागात शेकडो अंत्यसंस्कार रोज केले जातात. स्पेनमधील पिनोर (पिनोर) हे एक छोटेसे गाव आजकाल मोठ्या चर्चेत आहे. कारण देशभरातील सर्व अंत्य संस्कारासाठी येथून शवपेट्या पुरवल्या जातात. देशात सध्या शवपेट्या बनवण्याचे काम सुरू आहे. कोरोना विषाणूचा कहर वाढत असताना येथील कारखान्यांमध्ये कामगारांना नोकऱ्याही दिल्या जात आहेत. वाचा- अमेरिकेने वापरला मोदींचा पॅटर्न, कोरोनाला रोखण्यासाठी ट्रम्प यांनी कसली कंबर ‘व्यवसाय चांगला चालला आहे, पण लोक दु: खी आहेत’ पिनॉर हे वायव्य स्पेनच्या दुर्गम भागात एक छोटेसे गाव आहे. हे गाव शवपेट्यांसाठी ओळखले जाते. कोरोना विषाणूमुळे शवपेटीची मागणी वाढली असून नऊ कारखान्यांमध्ये दुप्पट ताबूत तयार करण्यात येत आहे. या गावात अद्याप कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकही घटना घडलेली नाही, परंतु मेयर आणि त्यांची टीम गावातील लोकांवर लक्ष ठेवून आहेत. गावचे मेयर जोसे लुईस गोंझालेझ यांच्या मते साथीच्या आजारामुळे लोकांची कामे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या गावाची लोकसंख्या सुमारे एक हजार आहे. त्यांनी वृत्तसंस्था एएफपीला सांगितले की, संकट सुरू झाल्यानंतर मागणी सामान्य दिवसांच्या तुलनेत दुप्पट झाली. मजूर एका दिवसात सुमारे 400 शवपेट्या तयार करीत आहेत. वाचा- ‘कोरोनाच्या संकटातही प्रेम आणि आशेचा किरण’, नर्स दाम्पत्याचा PHOTO VIRAL वर्षातील सर्वात जास्त नफा चीनकडून होणारी आयात बंद झाल्याने येथील उद्योग धंद्यावर परिणाम झाले आहेत. साथीच्या आजारामुळे मोठ्या संख्येने दररोज होणाऱ्या मृत्यूमुळे शवपेट्या तयार करण्यासाठी कच्चा माल मिळेनासा झाला आहे. जोसे लुईस गोंझालेझ यांनी, खेड्यात सर्व स्पेनमधून ऑर्डर येत आहेत आणि कामगार जास्त काळ काम करत आहेत, असे सांगितले. मेयर म्हणाले, ‘आता आम्ही जास्त तास काम करत आहोत आणि शवपेटी अतिशय माफक पद्धतीने तयार केली जात आहेत कारण मागणी जास्त आहे. पूर्वीप्रमाणे शवपेटीवर संगमरवरी किंवा ग्लास कोरण्यासाठी वेळ नाही’. एकीकडे शवपेट्या उद्यागांना चालना मिळत असली तरी, स्पेनमधील परिस्थिती भयावह आहे. वाचा- डोकं दुखायला लागलं म्हणून केलं अॅडमिट, X-ray पाहून डॉक्टरांनाच भरली धडकी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.