मराठी बातम्या /बातम्या /देश /

नवरा IAS आणि नवरी IPS, व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर प्रेमविवाह केला पण...

नवरा IAS आणि नवरी IPS, व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर प्रेमविवाह केला पण...

 एका आयएएस अधिकाऱ्याने आयपीएस असलेल्या प्रेयसीसोबत लग्न केलं. व्हॅलेंटाइन डेचे निमित्त साधत दोघे लग्नबंधनात अडकले.

एका आयएएस अधिकाऱ्याने आयपीएस असलेल्या प्रेयसीसोबत लग्न केलं. व्हॅलेंटाइन डेचे निमित्त साधत दोघे लग्नबंधनात अडकले.

एका आयएएस अधिकाऱ्याने आयपीएस असलेल्या प्रेयसीसोबत लग्न केलं. व्हॅलेंटाइन डेचे निमित्त साधत दोघे लग्नबंधनात अडकले.

    हावडा, 15 फेब्रुवारी : पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील एका आयएएस अधिकाऱ्याने आयपीएस असलेल्या प्रेयसीसोबत लग्न केलं. व्हॅलेंटाइन डेचे निमित्त साधत दोघे लग्नबंधनात अडकले. आयएएस तुषार सिंगला हे 2015 च्या बंगाल कॅडरचे अधिकारी आहेत. त्यांनी आयपीएस नवजोत सम्याल यांच्याशी लग्न केलं. सम्याल या बिहार कॅडरच्या 2018 च्या बॅचमधील आयपीएस आहेत. सम्याल सध्या पटना इथं एसीपी आहेत. रजिस्टर मॅरेज केल्यानंतर दोघांनी जवळच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्न केलं. दरम्यान तुषार यांच्या लग्नावरून प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांनी लग्नाची नोंदणी प्रक्रिया ही त्यांच्याच कार्यालयात केली.  शुक्रवारी तुषार यांच्या कार्यालयातच लग्नाची नोंदणी झाली. नोंदणीनंतर त्यांनी धार्मिक विधींची औपचािरकता मंदिरात पूर्ण केली. आयएएस अधिकारी असलेल्या सिंगला यांना नोंदणी कार्यालयात जाता आलं नाही. त्यामुळे सह्या त्यांच्याच कार्यालयातच घेण्यात आल्या. तिथला फोटो व्हायरल झाल्यानंतर सरकारी कार्यालयात लग्न केलं म्हणून काहींनी त्यांच्यावर टीका केली जात आहे. याबाबत राज्याचे मंत्री अरूप रॉय यांना विचारले असता त्यांनी यात काही चूक नसल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, यात काहीच वेगळं नाही. नोंदणीद्वारे लग्न करणं कायदेशीर प्रक्रिया आहे. तसेच सरकारी कार्यालयात लग्न झालं यावरून काहीच वाद नाही. दोघांनीही नोंदणीच्या कागदावर सह्या केल्या. सरकारी कार्यालयात कोणत्याही प्रकारचे जेवण किंवा कार्यक्रम आयोजित केला नव्हता. त्यामुळे वाद होण्याचं कारण नाही. बहुतेक ते ड्युटीवर होते त्यामुळे कार्यालयातच ही प्रक्रिया पार पाडावी लागली आणि यात काही चुकीचं नाही असंही अरूप रॉय म्हणाले. वाचा : मलायकाचा Black & White मधील हॉट अंदाज, सोशल मीडियावर PHOTO VIRAL
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या