Home /News /videsh /

लॉकडाऊनचा फज्जा, मौलानांच्या दफन विधीसाठी जमले तब्बल 1 लाख लोक

लॉकडाऊनचा फज्जा, मौलानांच्या दफन विधीसाठी जमले तब्बल 1 लाख लोक

लॉकडाऊनचे उल्लंघन, या घटनेमुळे नवीन कोरोनाव्हायरसचा उद्रेक होण्याची भीती निर्माण झाली आहे.

    ढाका, 20 एप्रिल : कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. जगभरात 24 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जवळजवळ सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असे असले तरी, लोकं अजूनही लॉकडाऊनकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही आहे. असाच प्रकार बांगलादेशमध्ये घडला. जेव्हा एका मौलानांच्या दफन विधीसाठी तब्बल 1 लाख लोकं जमले. बांगलादेशातील ब्राह्मणबेरिया जिल्ह्यात इस्लामिक पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी लोकांनी लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन केले. शनिवारी (18 एप्रिल) रोजी हा प्रकार घडला. या प्रकारानंतर अंत्यदर्शनासाठी उपस्थित सर्वांचा शोध सध्या वैद्यकीय कर्मचारी घेत आहेत. दरम्यान पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक शाह अली फरहाद आणि ब्राह्मणबारीया पोलीस प्रवक्ते इम्तियाज अहमद यांनी एक लाख लोकं जमल्याची माहिती दिली. वाचा-देशात कोरोना रुग्णांचा आकडा 17,265 वर; 24 तासांच वाढले 1553 संक्रमित, 543 मृत्यू इस्लामिक शिक्षिक मौलाना जुबैर अहमद अन्सारी यांच्या अंत्यसंस्काराने देशातील लॉकडाऊनचे उल्लंघन केले. त्याचबरोबर एकावेळी पाचपेक्षा जास्त लोकांनी नमाज पठण करू नये, या नियमालाही पायदळी तुडवले. या घटनेमुळे नवीन कोरोनाव्हायरसचा उद्रेक होण्याची भीती निर्माण झाली आहे. वाचा-रेड, ऑरेंज आणि ग्रीन...सरकार 'या' निकषांच्या आधारे ठरवतं कोरोनाचे झोन इस्लामवादी पक्षाचे सह-सरचिटणीस मोहम्मद ममुनुल हक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारोंच्या संख्येने लोक ब्राह्मणबेरिया जिल्ह्यातील रस्त्यावर उतरले होते. यातील बहुतांश लोकं मौलाना जुबैर अहमद अन्सारी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. केवळ ब्राह्मणबेरिया नाही तर आसपासच्या भागातूनही लोकं अंत्यसंस्कारासाठी सामील झाले. या प्रकारानंतर येथील पोलिसांवर टीका केली जात आहे. वाचा-सायलंट किलर बनतोय कोरोना? 66% पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये दिसले नाही एकही लक्षण पोलीसांवर गर्दीवर नियंत्रण ठेवू न शकल्याचा आरोप केला जात आहे. तर, परिणामी प्रभारी अधिकारी व सहाय्यक अधीक्षकांना तपासातून काढून इतक्या मोठ्या जमावाला एकत्र कसे येऊ दिले गेले याची चौकशी सुरू करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली, असे पोलीस प्रवक्ते सोहेल राणा यांनी सांगितले. पोलिस केंद्राचे प्रवक्ते. बांगलादेशमध्ये सध्या 2 हजार 456 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 91 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान बांगलादेशमध्ये सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे रुग्णांची संख्या जास्त असल्याचे म्हंटले जात आहे. संकलन, संपादन-प्रियांका गावडे
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या