नवी दिल्ली, 20 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर संसर्ग झालेल्यांची संख्या 16 हजारांच्या पुढे गेली आहे. हे आकडे सातत्याने वाढत आहेत. सरकारकडून दररोज कोरोना चाचण्यांची संख्या वाढविली जात आहे, मात्र या सगळ्यात देशातील सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना धक्का देणारी घटना समोर आली आहे. याचे कारण आहे कोरोना एक सायलंट किलर बनला आहे. आतापर्यंत आढळलेल्या जवळजवळ दोन तृतियांश रूग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत, परंतु असे असूनही त्यांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. चिंता वाढवणारे आकडे महाराष्ट्रातील 3645 रुग्णांपैकी 65% रुग्ण असे आहेत, ज्यांमध्ये कोरोनाचे एकही लक्षण दिसले नाही. उत्तर प्रदेशात 974 प्रकरणांपैकी 75 % रुग्णांमध्ये लक्षणे दिसली नाहीत. तर आसाममध्ये 34 प्रकरणांपैकी 82% रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आसामचे आरोग्यमंत्री हिमंता बिश्वा सर्मा स्वत: म्हणाले की, बरीच रूग्ण सकारात्मक चाचण्या करूनही लक्षणे दिसत नाही. याआधी देशाच्या विविध भागांमध्ये असे प्रकार घडले आहेत. वाचा- धक्कादायक! पोलिसांच्या गणवेशात तरुणाने केला अंदाधुंद गोळीबार, 16 जण जागीच ठार दिल्लीमध्येही वाढली चिंता दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सांगितले की 186 रूग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही चिन्हे नाहीत, असे असूनही ते पॉझिटिव्ह आहेत. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना हरियाणाचे कोव्हिड- 19 नोडल अधिकारी डॉ. सूरज भान कंबोज म्हणाले की, जर प्रमाण जास्त नसेल आणि विषाणू प्राणघातक नसेल तर लक्षणे दिसून येत नाहीत, परंतु ते चाचणीत दिसतात. दरम्यान असे का घडत आहे, याची ठोस कारणे डॉक्टरांनी मिळू शकलेली नाही आहेत. वाचा- ‘या’ देशात रुग्णांवर उपचार सोडून वैद्यकिय कर्मचारी वाचवत आहेत स्वत:चा जीव हे आहे कारण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रुग्णाच्या कोरोनाची लक्षणे दर्शविणे किंवा न दर्शविण्यामागील अनेक कारणे असू शकतात, जसे एखाद्याच्या शरीरात केवळ विषाणूचे प्रमाण, त्याचे रोग प्रतिकारशक्ती पातळी आणि रुग्णाचे वय. अशा परिस्थितीत कोरोना रूग्णाला पकडणे फार अवघड आहे. जास्तीत जास्त चाचणी करणे हे टाळण्यासाठी फक्त एक उपाय आहे. वाचा- जगभरात शेकडो Coronavirus, आतापर्यंत 7 मानवासाठी ठरले घातक संकलन, संपादन-प्रियांका गावडे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.