जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / सावधान! आता फक्त 10 मिनिटांत असे होऊ शकता कोरोनाचे शिकार, समोर आला नवा रिपोर्ट

सावधान! आता फक्त 10 मिनिटांत असे होऊ शकता कोरोनाचे शिकार, समोर आला नवा रिपोर्ट

सावधान! आता फक्त 10 मिनिटांत असे होऊ शकता कोरोनाचे शिकार, समोर आला नवा रिपोर्ट

घराबाहेर पडण्याआधी वाचा ही बातमी, कोरोना आता आणखी जलद गतीनं पसरत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 मे : देशात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वेगानं होत आहे. त्यामुळेच चौथ्या टप्प्यात लॉकडाऊन वाढवला आहे. दरम्यान आता कोरोनानं रुप बदलत असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. त्यामुळं शास्त्रज्ञांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक अंतरचं (social disrancing) महत्त्व शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा समजावून सांगितलं आहे. कारण आता नवीन रिपोर्टनुसार कोरोना फक्त 10 मिनिटांत पसरल्याचं समोर आलं आहे. शास्त्रज्ञांना असा शोध लागला आहे की, आपल्या शरीरातून द्रवपदार्थाचे कण जसे की शिंका आणि खोकल्यातून अथवा श्वास घेताना बाहेर पडतात. त्यामुळं निरोगी व्यक्तींना कोरोना विषाणूचा त्रास होऊ शकतो. एका नव्या अभ्यासातून असं समोर आलं आहे की खोकला आणि शिंका यासह इतर माध्यमांद्वारे आपल्या शरीराबाहेर पडणारे कण यामुळे दहा मिनिटांत कोरोनाची लागण होऊ शकते. वाचा- तुमच्या फोनवर असू शकतो हा व्हायरस, Whatsapp आणि Facebook वापरताना घ्या काळजी मॅसेच्युसेट्स युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञ अॅरिन ब्रोमेज यांनी एक नवीन फॉर्म्युला तयार केला आहे. कोरोना विषाणूचा किती संसर्ग आपल्याला संक्रमित करतो त्यानुसार हे आपल्या संक्रमित ठिकाणी घालवलेल्या वेळेनुसार निश्चित केले जाईल. अॅरिन सामान्य संवाद आणि संक्रमणांचा अभ्यास केला आहे. जर एखाद्या निरोगी व्यक्तीने कोरोना संक्रमित व्यक्तीसह सामाजिक अंतर राखले नाही तर 10 मिनिटांत संसर्ग होऊ शकतो, असा निष्कर्ष अॅरेन यांनी काढला आहे. सामान्यता श्वास घेताना, एका व्यक्तीच्या नाका तोंडातून 50 ते 50 हजार कण बाहेर पडतात. ते वाऱ्यामध्ये मिसळतात. आपल्याला जाणवत नसले तरी, आपण त्यांना पाहू शकता. चष्माच्या काचेवर हलके स्टीम म्हणून जमा केलेले दिसेल. वाचा- कोरोनामुळे मृत्यू झाला तर शवविच्छेदन करण्याची गरज आहे का? ICMR चा मोठा खुलासा याआधी कोरोना व्हायरस हवेत 14 मिनिटं राहत असल्याचा पुरावा सापडला होता. त्यामुळं जर तुम्ही घराबाहेर पडत असाल तर, काळजी घ्या कारण फक्त 10 मिनिटांत कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. वाचा- लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच वधू निघाली पॉझिटिव्ह, वरासह 32 जणं क्वारंटाइन

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात