तेहरान, 07 मार्च : हजारो लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोनाव्हायरसनं (Coronavirus) सरकारला धक्का दिला आहे. या महाभयंकर अशा विषाणूची लागण झाल्यानं एका खासदाराचा (MP) मृत्यू झाला आहे. या व्हायरसमुळे जगभरात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3 हजारपेक्षा जास्त आहे. इराणमधील खासदार फतेमेह राहबर (Fatemeh Rahbar) यांचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. IRNA या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. हे वाचा - चीननंतर ‘या’ देशात Coronavirus चा कहर, 24 तासांत तब्बल 49 रुग्णांचा मृत्यू 55 वर्षीय फतेमेह राहबर या नुकत्याच तेहरानमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. इराणमध्ये फेब्रुवारीच्या मध्यात कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला. फतेमेह यांनाही कोरोनाव्हायरसची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्या इराणमधील त्या दुसऱ्या लॉमेकर आहेत.
#Iran on Saturday reported 1,076 new confirmed #COVID19 cases and 21 deaths.
— People's Daily, China (@PDChina) March 7, 2020
Iran now has:
- 5,823 confirmed
- 145 deaths
- 1,669 recovered pic.twitter.com/4gWfdaBRCq
इराणमध्ये फेब्रुवारीत कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला. शनिवारी इराणमध्ये 21 आणखी रुग्णांचा मृत्यू झाला तर 1,076 नवीन प्रकरणं समोर आलीत. त्यानंतर इराणमध्ये कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 145 झाली आहे, तर 5,823 जणांना याची लागण झाली आहे. हे वाचा - ‘डान्स अगेन्स्ट द व्हायरस’, ‘कोरोना’पासून वाचण्यासाठी पाहा हा Video आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, 16 हजारपेक्षा जास्त लोकांना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 1,669 रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. जगभरात कोरोनाव्हायरसच्या प्रकरणं 1,01,988 झालीत तर 3,491 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या देशांमध्ये दक्षिण कोरिया, इटली, इराण आणि फ्रान्सचा समावेश आहे. भारतातही कोरोनाव्हायरसचे रुग्ण वाढत आहेत, आतापर्यंत 33 जणांना कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं आहे.