पुणे, 26 मार्च : एकीकडे जगभर कोरोनाची दहशत असताना दुसरीकडे पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात 24 तासांत 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच 48 तासांत शहराच्या हद्दीत एकाही कोरोनाग्रस्त रुग्णाची भर पडली नाही, असंही माहिती मोहोळ यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. कोरोनाला मुळापासून नष्ट करण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. प्रत्येकाने या नियमांचं पालन केलं तर त्याचा मोठा फायदा जनतेला होऊ शकतो. महाराष्ट्रातील पहिलं कोरोनाग्रस्त दाम्पत्य यांच्यासह दाम्पत्याची मुलगी, दाम्पत्याला मुंबईहून घेऊन येणारा कॅब चालक आणि दुबई ट्रिपमधीलसह एक प्रवासी यांचा यात समावेश आहे. यातील दाम्पत्याचे दुसरे निगेटिव्ह रिपोर्ट मंगळवारी रात्री उशिरा तर उरलेल्या तिघांचे निगेटिव्ह रिपोर्ट बुधवारी संध्याकाळी आले आहेत. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ते आता ठणठणीत बरे झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. हे वाचा - आदिवासी बांधवांनी लढवली अनोखी शक्कल, चक्क तयार केलं नैसर्गिक मास्क या संदर्भात महापौर मोहोळ म्हणाले की, ‘कोरोनाचं संकट मोठं असलं तरी त्यावर मात करता येत आहे, हा विश्वास महत्वाचा आहे. यासाठी महापालिकेची आरोग्ययंत्रणा अहोरात्र कष्ट घेत असून योग्य समन्वय आम्ही ठेवला आहे. कोरोनामुक्त होता येत असले तरी नागरिकांनी काळजी घेणं आवश्यकच आहे’ दरम्यान, भारतातील (India) कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्णांचा आकडा वाढला आहे. एकूण 606 रुग्ण कोरोनाव्हायरसच्या विळख्यात आहे. त्यापैकी 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक 122 रुग्ण आहेत. म्हणजे प्रत्येकी पाचवा रुग्ण हा राज्यातील आहे. हे वाचा - बघता बघता आगीत भस्मसात झालं गोडाउन! ठाण्याच्या आगीचे भीषण PHOTO केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाव्हायरसची एकूण आकडेवारी जारी केली आहे. एकूण 606 प्रकरणांपैकी 553 प्रकरणं अॅक्टिव्ह आहेत, तर 42 रुग्ण बरे झालेत, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात दिवसभरात कोरोनाचे नवे 15 रुग्ण आढळलेत. यामध्ये मुंबईत 9, ठाण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. तर सांगलीत एकाच कुटुंबातील 5 जणांना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 122 वर पोहोचला आहे. तर राज्यातील पहिले 2 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे वाचा - ‘लॉकडाउन’मुळे प्रेमाला आला बहर, कंडोम्सच्या विक्रीत विक्रमी वाढ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








