मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लॉकडाऊनमध्ये डिप्रेशनमुळे अभिनेत्याची आत्महत्या, मृत्यूनंतर कोरोनामुळे लोकांनी मदतही नाकारली

लॉकडाऊनमध्ये डिप्रेशनमुळे अभिनेत्याची आत्महत्या, मृत्यूनंतर कोरोनामुळे लोकांनी मदतही नाकारली

लॉकडाऊमुळे काम बंद असल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या अभिनेत्यानं आत्महत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह तासभर लटकत असताना कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही.

  • Published by:  Suraj Yadav
मुंबई, 16 मे : लॉकडाऊमुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. यामुळे लोक डिप्रेशनचा सामना करत आहेत. या डिप्रेशनमुळेच एका टीव्ही अॅक्टरनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सब टीव्हीवरील शो आदत से मजबूर मध्ये दिसलेला मनमीत ग्रेवालनं शुक्रवारी आत्महत्या केली. 32 वर्षीय मनमीतनं गळफास घेऊन आत्महत्या केली. तो पत्नीसोबत नवी मुंबईत राहत होता. देशात सुरु असलेल्या लॉकडाऊमुळे त्याचं काम पूर्ण थांबलं होतं. आर्थिक अडचणींमुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मनमीत पहिल्यापासून आर्थिक अडचणींचा सामना करत होता. त्यातच लॉकडाऊनमुळे यात आणखी वाढ झाली. त्याची सर्व कामे आणि प्रोजेक्ट बंद झाले. त्याला घरभाडं देणंही कठीण बनलं होतं. लॉकडाऊनमध्ये मनमीतच्या संकटात भर पडली. मनमीतच्या एका मित्राने सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून त्याला पैशांची समस्या होती. पर्सनल आणि प्रोफेशनल कामासाठी त्यानं कर्ज घेतलं होतं. लॉकडाऊमुळे काम मिळणं बंद झालेलं. त्यामुळे कमाईसुद्धा होत नव्हती. देणेकऱ्यांचे पैसे कसे द्यायचे याचं त्याला टेन्शन होतं. त्यामुळेच मनमीतनं टोकाचं पाऊल उचलल्याचं त्याच्या मित्राने सांगितलं.
मनमीतचा मित्र म्हणाला की, कोरोनामुळे लोकांनी मनमीतवर अंत्यसंस्कारावेळीही मदत केली नाही. पत्नीने जेव्हा मृतदेह लटकताना पाहिला तेव्हा लोकांकडे मदत मागितली पण कोणीही जवळ आलं नाही. काही वेळाने डॉक्टर आणि पोलीसही तिथं पोहोचले मात्र त्यांनीसुद्धा मदत केली नाही असं मित्र म्हणाला. त्यानं एबीजी न्यूजशी बोलताना ही माहिती दिली. जवळपास एक तासानंतर बिल्डिंगच्या गार्डने मनमीतचा मृतदेह खाली उतरवला आणि त्याला रुग्णालयात नेलं. त्याठिकाणी त्याला मृत घोषित कऱण्यात आलं. हे वाचा : कोरोनानंतर आता पावसानं ओढावलं संकट, मुंबईत एकाचा मृत्यू तर 7 कुटुंब उघड्यावर
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या