जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / डेव्हिड वॉर्नरचा 'बाहुबली' अवतार, पण बाबाच्या व्हिडिओत लेकीनं मारली बाजी

डेव्हिड वॉर्नरचा 'बाहुबली' अवतार, पण बाबाच्या व्हिडिओत लेकीनं मारली बाजी

डेव्हिड वॉर्नरचा 'बाहुबली' अवतार, पण बाबाच्या व्हिडिओत लेकीनं मारली बाजी

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने बाहुबलीच्या अवतारात एक व्हिडिओ शेअर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सिडनी, 16 मे : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचे भारत प्रेम सर्वांनाच माहिती आहे. आयपीलएमध्ये हैदराबादकडून खेळणारा वॉर्नर सोशल मीडियावर सक्रीय असतो. आता त्याचा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात वॉर्नर बाहुबलीचा डायलॉग बोलताना दिसत आहे. त्याची मुलगीही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. टिकटॉकवर डेव्हिड वॉर्नरने बाहुबलीच्या वेष करून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात वॉर्नरनं बाहुबलीतला डायलॉग म्हटला आहे. त्याच्या या व्हिडिओचं चाहते कौतुक करत आहे. वॉर्नरसह इतरही काही परदेशी खेळाडू व्हिडिओ शेअऱ करत आहेत. यात पीटरसनने सुद्धा काही व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचं मन जिंकलं होतं.

जाहिरात

भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैना आणि इरफान पठाण यांनी वॉर्नरचा व्हिडिओ चहलपेक्षा जास्त फनी असल्याचं म्हटलं आहे. सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असल्यानं डेव्हिड वॉर्नर टॉलिवूडकडे जास्त आकर्षित होतो. त्यानं याआधी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या एका गाण्यावर डान्स केला होता.

ऑस्ट्रेलियातही कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या परिस्थितीत वॉर्नर त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. कोरोना 180 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला असून आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. जगातील 45 लाखांपेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. हे वाचा : अनुष्काने विराटला टाकला बाऊन्सर, लॉकडाऊनमध्ये क्रिकेट खेळताना VIDEO व्हायरल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: tiktok
  • First Published :
जाहिरात
जाहिरात