Home /News /videsh /

थंडीत कोरोना पुन्हा वाढला तर ओढावणार दुहेरी संकट, अमेरिकन तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

थंडीत कोरोना पुन्हा वाढला तर ओढावणार दुहेरी संकट, अमेरिकन तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

जगभरात कोरोनाने थैमान घातलं असून आतापर्यंत जवळपास 50 लाखांहून अधिक जणांना याची लागण झाली आहे.

    वॉशिंग्टन, 21 मे : कोरोनाने सध्या जगभर थैमान घातले आहे. आतापर्यंत जगात एकूण 51 लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकट्या अमेरिकेत 90 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावर अद्याप उपचार सापडलेला नाही. दमर्यान, अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव थंडीच्या काळात पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. अमेरिकेत पुन्हा कोरोना पसरला तर जगाला पुन्हा या संकटाचा सामना करावा लागेल. फायनान्शियल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेची सरकारी संस्था सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे प्रमुख रॉबर्ट रेडफील्ड यांनी म्हटलं की, ज्या प्रकारे दक्षिण गोलार्धात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यावरून अशी शंका आहे की पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पुन्हा वाढ होऊ शकते. अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं की, पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोना चाचणी करण्याची क्षमता वाढवावी लागेल. जर असं झालं नाही तर दुहेरी संकट निर्माण होईल. कोरोना आणि मोसमी फ्ल्यू हे दोन्ही एकत्र येतील. अशावेळी दोन्ही पातळ्यांवर नागरिकांसह प्रशासकिय यंत्रणेला सज्ज रहावं लागेल. डॉक्टर रॉबर्ट यांनी सांगितलं की, आम्हाला हे दिसलं की आधी कोरोना फ्लू प्रमाणे दक्षिण गोलार्धात जाईल. सध्या कोरोना ब्राझीलमध्ये आहे. तिथून पुन्हा पुढे उत्तर गोलार्धाच्या दिशेनं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल. कोरोना व्हायरसनं अमेरिकेला मोठा दणका दिला. हा कोणा एकाचा दोष नाही. अमेरिका अशा संकटासाठी तयार नव्हती. हे वाचा : आता फक्त 10 मिनिटांत होऊ शकता कोरोनाचे शिकार, समोर आला नवा रिपोर्ट अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय पेंटागनच्या कागदपत्रानुसार असं सांगण्यात आलं आहे की, 2021च्या जुन ते जुलै महिन्यापर्यंत कोरोनावर वॅक्सिन उपलब्ध होणार नाही. मात्र अशीही शंका व्यक्त केली जात आहे की कोरोना पुन्हा एकदा रौद्ररुप धारण करू शकतो. अमेरिकेन सेनेच्या लीग झालेल्या कागदपत्रांमधून हा खुलासा झाला आहे. पण याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. हे वाचा : 4 दिवस काम तर 3 दिवस फिरा!पर्यटन वाढवण्यासाठी या देशाच्या पंतप्रधानांचा प्रस्ताव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या