जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / 'उन्हात नष्ट होतो कोरोना', प्रयोग अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेचा दावा

'उन्हात नष्ट होतो कोरोना', प्रयोग अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेचा दावा

कोरोना व्हायरसनं सध्या देशात थैमान घातलं आहे. या व्हायरसच्या संक्रममापासून वाचण्यासाठी स्वच्छता राखण्याचं आणि स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन सरकार कडून करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसनं सध्या देशात थैमान घातलं आहे. या व्हायरसच्या संक्रममापासून वाचण्यासाठी स्वच्छता राखण्याचं आणि स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन सरकार कडून करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखणारी लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता अमेरिकेनं एक अजब दावा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 19 एप्रिल : चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध सापडलेलं नाही. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग एवढा एकच पर्याय सध्या आहे. त्यामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखणारी लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता अमेरिकेनं एक अजब दावा केला आहे. उन्हामुळे कोरोनाचे विषाणू नष्ट होतात असा दावा अमेरिकेनं केला आहे. होमलँड सिक्युरिटी विभागात यावर प्रयोग सुरू आहे. त्याचा निष्कर्ष अंतिम टप्प्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. जगात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. आतापर्यंत जवळपास 36 हजारहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या व्हायरसवर लवकरात लवकर औषध निर्मितीसाठी आणि लस तयार करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. याहू न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार याआधी शास्त्रज्ञांच्या मते उच्च तापमान असेल तर कोरोनाचे विषाणू वेगानं वाढण्याचा धोका कमी असतो. याशिवाय अशा तापमानात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. याच्यावर आधारित सध्या प्रयोग सुरू आहे. मात्र अद्याप या दाव्याची अधिकृतपणे पुष्टी कऱण्यात आलेली नाही. हे वाचा : चीनने पसरवला का कोरोना? अमेरिकेच्या दाव्यावर वुहानच्या लॅबनं दिलं उत्तर उच्च तापमान आणि चांगली प्रतिकारशक्ती असेल तर कोरोना व्हायरसचे विषाणू अधिक काळ टिकू शकत नाहीत असं होमलँड सिक्युरिटी विभागाने केलेल्या प्रयोगात समोर आलं. उन्हात कोरोनाचे विषाणू लवकर नष्ट होतात असा दावाही करण्यात आला आहे. जिथं उष्णता कमी असते तिथं प्रादुर्भाव कमी करण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज असल्याचंही संशोधकांनी म्हटलं आहे. हे वाचा : लसीच्या आशेवर राहू नका, कोरोनाच्या दहशतीत जगावं लागेल; WHO ने केलं सावध संपादन - सूरज यादव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात