टोकिया, 11 फेब्रुवारी : भारताने (India) चीनमध्ये (China) अडकलेल्या आपल्या नागरिकांना तिथून बाहेर काढलं, मात्र आता जपानमध्येही (Japan) काही भारतीय अडकलेत आणि या भारतीयांनी कोरोनाव्हायरसपासून (Coronavirus) आम्हाला वाचावा, अशी आर्त हाक पंतप्रधान मोदींना घातली आहे. जपानच्या क्रुझवर (cruise) असलेल्या या भारतीयांना सोशल मीडियावर (social media) व्हिडिओ शेअर केला आहे. जपानच्या किनारपट्टीवर डायमंड प्रिंसेस (Dimond princess) क्रूझला वेगळं ठेवण्यात आलं आहे. या क्रुझवर क्रू मेंबर्ससहित 3,700 जण आहेत. 500 जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आलेत. आतापर्यंत 137 जणांना कोरोनाव्हायरस झाल्याचं निदान झालं आहे. या क्रुझवर एकूण168 भारतीय आहेत. त्यापैकीच एक असलेले विनयकुमार यांनी हा व्हिडिओ आपल्या फेसबुकवर पोस्ट केला आहे. विनयकुमार यांनी व्हिडिओत सांगितल्यानुसार, “क्रुझवर असलेल्या 137 जणांची कोरोनाव्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आलेत. क्रुझवर 160 क्रू मेंबर्स आणि 8 प्रवासी असे एकूण 168 भारतीय आहेत. 90 टक्के भारतीय क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. त्यामुळे माझी पंतप्रधान मोदींना विनंती आहे की त्यांनी आम्हाला वाचवावं, इथून बाहेर काढून आम्हाला आमच्या घरी पोहोचवावं” हेदेखील वाचा - वुहानची धक्कादायक सॅटेलाईट इमेज, ‘कोरोना’मुळे 14,000 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय दरम्यान या सर्व परिस्थितीवर भारत सरकार लक्ष ठेवून आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत ट्विट केलं होतं. “जपानच्या क्रुझवरील क्रू मेंबर्स आणि कोणत्याही प्रवाशाला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं अद्याप समोर आलेलं नाही. जपानमधील भारतीय दूतावासाने क्रुझवर भारतीय अडकल्याचं सांगितलं आहे”, असं या ट्विटमध्ये ते बोलले होते.
Many Indian crew & some Indian passengers are onboard the cruise ship #DiamondPrincess quarantined off Japan due to #Coronavirus. None have tested positive, as per the latest information provided by our Embassy @IndianEmbTokyo. We are closely following the developments.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) February 7, 2020
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात हे क्रुझ जपानच्या किनाऱ्यावर पोहोचलं, या क्रूझमधून हाँगकाँगमध्ये 25 जानेवारीला उतरलेल्या एका प्रवाशाला कोरोनाव्हायरस असल्याचं 2 फेब्रुवारीला समजलं. त्यानंतर जपान सरकारनं या क्रुझमधून कुणालाही बाहेर पडण्यास प्रतिबंध केला आणि या क्रुझला वेगळं ठेवण्यात आलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या क्रुझवरील परिस्थिती खूपच गंभीर आहे. कोरोनाव्हारस प्रवाशांमध्ये झपाट्याने पसरतो आहे. जवळपास ६०० जणांना उपचारांची गरज आहे. हेदेखील वाचा - भारताने करून दाखवलं! ‘कोरोना’ग्रस्त पहिल्या 2 रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा