वुहान 11 फेब्रुवारी : चीनमध्ये (China) कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) मृतांची संख्या 1000 पेक्षा जास्त झाली आहे. मात्र खरं तर हा आकडा यापेक्षाही मोठा असण्याची शक्यता आहे. चीन सरकार मृतांची संख्या लपवण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे, याचं कारण आहे ते म्हणजे कोरोनाव्हायरसचा केंद्रबिंदू असलेल्या वुहान (Wuhan) शहराचं धक्कादायक असं सॅटेलाईट इमेज (Satellite image). वुहान शहराच्या या सॅटेलाईट इमेजमध्ये आगीसारखा गोळा आहे, ज्यामध्ये सल्फर डायऑक्साईड (SO2) गॅस दिसतो आहे. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा वैद्यकीय कचरा किंवा मृतदेह जाळले जातात, तेव्हाच इतक्या प्रमाणात सल्फर डायऑक्साईड निघतो.
Pic Credit - Windy
मात्र चीनमध्ये मृतदेह जाळण्याची परंपरा नाही. तरीदेखील वुहानमध्ये गेल्या आठवड्यात सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण 1,350 यूजी/घनमीटर तर काल (सोमवारी) 1,700 यूजी/घनमीटर होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, सल्फर डायऑक्साईड 80 यूजी/घनमीटर पातळी धोकादायक आहे. म्हणजेच वुहानमधील ही पातळी धोकादायक पातळीच्या 21 पट अधिक आहे. हेदेखील वाचा -
भारताने करून दाखवलं! ‘कोरोना’ग्रस्त पहिल्या 2 रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा
चोंग्किंगमध्येही (Chongqing) अशीच परिस्थिती आहे, जिथं कोरोनाव्हारयसचं संक्रमण मोठ्या प्रमाणात झालं आहे. हे शहर वुहानपासून 900 किमी दूर आहे पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, इतक्या प्रमाणात सल्फर डायऑक्साईड गॅस निघणं म्हणजे जवळपास 14,000 मृतदेह जाळले असतील. मृतांचा आकडा लपवण्यासाठी चीन सरकार रुग्णांचे मृतदेह जाळत आहे, असा आरोप केला जातो.
Pic Credit - Windy
चीन सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार 11 फेब्रुवारीपर्यंत चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे 1,016 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर 42,200 पेक्षा अधिक जणांचा याचं संक्रमण झालं आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार वुहानमध्ये येत्या काही दिवसांत 5 लाख लोकांना कोरोनाव्हायरसची लागण होण्याची शक्यता आहे. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनने वुहानमध्ये कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाचा अभ्यास केला. या अभ्यासानुसार कोरोनाव्हायरसचं संक्रमण अशाच गतीने होत राहिलं तर फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत शहरातील 5 टक्के लोकसंख्या म्हणजे 5 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना याची लागण होईल.