भारताने करून दाखवलं! ‘कोरोना’ग्रस्त पहिल्या 2 रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा

भारताने करून दाखवलं! ‘कोरोना’ग्रस्त पहिल्या 2 रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा

केरळच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (NIA) मध्ये पाठवण्यात आलेले कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) या रुग्णांच्या रक्ताचे नमुने नेगेटिव्ह आलेत.

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 10 फेब्रुवारी : महाभयंकर अशा कोरोनाव्हायरसला (Coronavirus) हरवण्यासाठी संपूर्ण जगाचे प्रयत्न सुरू आहे. भारताने मात्र हा लढा जिंकला आहे. भारतातील (India) पहिल्या 2 कोरोनाग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. कोरोनाव्हायरसच्या या रुग्णांच्या रक्ताचे नमुने आता नेगेटिव्ह आलेत.

भारतात 30 जानेवारीला कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण केरळात आढळून आला. त्याच्यावर थ्रिसुर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू करण्यात आले. यानंतर केरळातच आणखी 2 रुग्ण सापडले. या तिन्ही रुग्णांना तात्काळ विशेष वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. हे तिघंही चीनच्या वुहानमध्ये शिकत होते. वुहानला कोरोनाव्हायरसचा केंद्रबिंदू मानला जातो. इथूनचा या व्हायरसच्या संक्रमणाला सुरुवात झाली आणि हा व्हायरस जगभर पसरला.

भारतातील पहिल्या 2 रुग्णांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. या दोन्ही रुग्णांच्या रक्ताचे नमुने केरळच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (NIA) मध्ये पाठवण्यात आले होते, ते नेगेटिव्ह आलेत. आता पुण्यातल्या इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीद्वारे मिळणाऱ्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. हा रिपोर्ट आल्यानंतर या रुग्णांच्या डिस्चार्जबाबत निर्णय घेण्यात येईल.

हेदेखील वाचा -  सावधान ! भारताला 'कोरोना'चा सर्वाधिक धोका, ‘या’ शहरांत झपाट्याने पसरेल व्हायरस

दरम्यान कोरोनाव्हायरसचा भारतातील पहिला रुग्ण 5 जणांच्या संपर्कात आला होता. त्या सर्वांची चाचणी केली असता, कुणालाही कोरोनाव्हायरसची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं. चीनमध्ये या व्हायरसने 908 जणांचा जीव घेतला आहे, तर 40,000 जणांना याची लागण झाली आहे.

कोरोनाव्हायरसची लक्षणं

सर्दी

ताप

खोकला

घसा खवखवणे

श्वास घेताना त्रास

डोकेदुखी

हेदेखील वाचा - कोरोना प्रकरणाची पोलखोल करणारा पत्रकार बेपत्ता, आईने व्यक्त केली भीती

कोरनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी काय कराल?

हात स्वच्छ धुवा

शिंकताना, खोकताना तोंडासमोर रुमाल धरा

सर्दी-खोकला-तापाची लक्षणं दिसल्यास त्या व्यक्तीच्या जास्त संपर्कात राहू नका

प्राण्यांपासून दूर राहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2020 06:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading