जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / चीनमुळेच पसरला कोरोना व्हायरस? अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांचा सगळ्यात मोठा खुलासा

चीनमुळेच पसरला कोरोना व्हायरस? अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांचा सगळ्यात मोठा खुलासा

President Donald Trump, left, meets with Chinese President Xi Jinping during a meeting on the sidelines of the G-20 summit in Osaka, Japan, Saturday, June 29, 2019. (AP Photo/Susan Walsh)

President Donald Trump, left, meets with Chinese President Xi Jinping during a meeting on the sidelines of the G-20 summit in Osaka, Japan, Saturday, June 29, 2019. (AP Photo/Susan Walsh)

अमेरिकेच्या अध्यक्षांचं ऑफिस, परराष्ट्र मंत्रालय आणि इतर कार्यालयांकडून अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांवर प्रचंड दबाव येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 01 मे : जगभर धुमाकूळ घालणारा कोरोनाव्हायरस हा चीनमुळेच पसरला असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत असतात. ट्रम्प यांनी कोरोनाला वुहान आणि चायना व्हायरस असंही नाव दिलं होतं. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या National Intelligence ने यावर जाहीर मोठा खुलासा केलाय. हा व्हायरस चीनने तयार केला, तो मानव निर्मित आहे किंवा व्हायरसमध्ये अनुवंशिक बदल करण्यात आले याबाबत आत्तापर्यंत कुठलाही ठोस पुरावा मिळालेला नाही असं National Intelligenceच्या संचालकांनी सांगितलं आहे. CNN ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या खुलाश्यामुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तोंडघशी पडले आहेत. त्यांना यावर जेव्हा पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं तेव्हा ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. चीननेच हा व्हायरस पसरवला याचे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत. मात्र त्याबाबत मी तुम्हाला सांगणार नाही असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले. दरम्यान, अमेरिकेच्या अध्यक्षांचं ऑफिस, परराष्ट्र मंत्रालय आणि इतर कार्यालयांकडून अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांवर प्रचंड दबाव येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा व्हायरस पसरला कसा? तो चीनने पसरवला का? वुहानच्या लॅबमधून तो पसरला का? त्याचं मुळ काय आहे? असे असंख्य प्रश्नांची उत्तर गुप्तचर संस्थांना मागितली जात आहेत. हे वाचा - कोरोनाला ‘या’ 33 देशांमध्ये NO ENTRY! 2 महिन्यांत एकही रुग्ण नाही त्या दबावातूनच गुप्तचर संस्थांच्या संचालकांनी हा चाहीर खुलासा केला असं मानलं जातं आहे. मात्र त्यामुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राग ओढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान मोदींना Unfollow का केलं? व्हाइट हाऊसने दिलं ‘हे’ उत्तर अमेरिकेसारख्या इतर पाश्चिमात्य देशांनी चीनला टार्गेट केलं आहे आणि अशाच आरोपांना चीनचं सरकारी वृत्तपत्र पिपल्स डेलीने (People’s Daily) उत्तर दिलं आहे. कोरोनाव्हायरस चीनच्या लॅबमध्ये बनवण्यात आला कोविड-19 हा नैसर्गिक नसून चीनच्या लॅबमध्ये तयार करण्यात आला, असं म्हटलं जातं आहे. पिपल्स डेलीमध्ये सांगण्यात आलं की, हा व्हायरस नैसर्गिक आहे, हे अनेक वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालं आहे. फेब्रुवारीमध्ये जर्मनीतील व्हायरोलॉजिस्ट ख्रिश्चन ड्रॉस्टेनसह इतर 26 शास्त्रज्ञांनी लॅन्सेट जर्नलमध्ये या व्हायरसला नैसर्गिक सांगितलं आहे. खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनंही याची पुष्टी केली आहे. पाकमध्ये आणखी एका हायप्रोफाईल नेत्याला कोरोना, इम्रान खान यांची घेतली होती भेट चीनवर कोरोनाव्हायरस पसरवण्याचे आरोप आहेत, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेलाही चीनने आपल्या बाजून केलं असं म्हटलं जातं. पिपल्स डेलीमध्ये म्हणण्यात आलं आहे की, जागतिक आरोग्य संघटना ही एक जागतिक आणि स्वतंत्र संस्था आहे, तिला आपल्या बाजूनं कसं करता येईल? जागतिक आरोग्य संघटनेच्या लीडरशिपमध्ये फक्त रेन मिनघुई हे एकच चीनी सदस्य आहे. तर 11 सदस्य अमेरिका, युरोप आणि कॅनडातील आहेत. फंडिंग थांबवण्यापूर्वी तर अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला सर्वात जास्त फंड देत होतं. फंडिग देण्याबाबत चीन सहावा आहे. अशा स्थितीत सामान्यत: अमेरिकेचा दबदबा जास्त आहे. मग चीन WHO ला आपल्या बाजूनं कसं करू शकतो?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात