पंतप्रधान मोदींना Unfollow का केलं? व्हाइट हाऊसने दिलं 'हे' उत्तर

पंतप्रधान मोदींना Unfollow का केलं? व्हाइट हाऊसने दिलं 'हे' उत्तर

व्हाइट हाउसने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी यांच्यासह काही ट्विटर हँडलना फॉलो केलं होतं. सध्या फक्त 13 ट्विटर हँडलला फॉलो केलं जात आहे.

  • Share this:

वॉशिंगटन, 30 एप्रिल : व्हाइट हाऊसच्या ट्विटर हँडलवरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो - अनफॉलो केल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली होती. दरम्यान, याबाबत व्हाइट हाऊसनेच माहिती दिली आहे. व्हाइट हाऊसकडून पंतप्रधान मोदींना अनफॉलो का करण्यात आलं याबद्दल सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा परदेश दौऱ्यावर जाता तेव्हा त्या देशांच्या अधिकारी आणि प्रमुख नेत्यांच्या ट्विटर हँडलला फॉलो केलं जातं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दौऱ्यावर असताना संबंधित देशांचे प्रमुख, अधिकारी यांच्या ट्विटरवरून जे काही दौऱ्याबद्दल पोस्ट केलं जातं ते रिट्विट करण्यासाठी फॉलो केलं जातं. फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा व्हाइट हाऊसने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय आणि अमेरिकेतील भारतीय दूतावासासह काही प्रमुख ट्विटर हँडलला फॉलो केलं होतं. आता ते परतल्यानंतर पुन्हा अनफॉलो करण्यात आलं आहे.

आता व्हाइट हाऊसने सहा ट्विटर हँडल वगळता इतर सर्वांना अनफॉलो केलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनफॉलो केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते की, यामुळे मी निराश झालो. परराष्ट्र मंत्रालयानं याची माहिती घ्यायला हवी.

हे वाचा : White House ने पंतप्रधान मोदींना ट्विटरवर केलं Unfollow , राहुल म्हणतात...

सध्या व्हाइट हाऊस फक्त 13 हँडलला फॉलो करत आहे. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, उपराष्ट्रपती माइक पेंस आणि ट्रम्प यांच्या प्रशासनातील काही लोकांचा समावेश आहे. भारताच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना व्हाइट हाऊसच्या ट्विटरवरून फॉलो करण्याची पहिलीच वेळ होती.

हे वाचा : तंबाखूने होऊ शकतो कोरोनावर उपचार! 'या' देशाने निकोटीनच्या विक्रीवर आणली बंदी

संपादन - सूरज यादव

First published: April 30, 2020, 9:23 PM IST

ताज्या बातम्या