Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाच्या संकटात जगातील 'हे' 10 देश सर्वात जास्त सुरक्षित; पाहा भारत कितव्या स्थानी

कोरोनाच्या संकटात जगातील 'हे' 10 देश सर्वात जास्त सुरक्षित; पाहा भारत कितव्या स्थानी

कोरोनाव्हायरसच्या महासाथीत सुरक्षित असलेल्या देशांची (World Safest Country in Covid19) यादी तयार करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 10 जून : जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कोरोनाव्हायरसने (coronavirus) आपले हातपाय पसरलेले आहेत. सर्वात जास्त कोरोनाव्हायरसची प्रकरणं असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे तर भारताचा (india) सहावा क्रमांक आहे. जगात आता असा कोणता देश आहे जो कोरोनाच्या संकटातही सुरक्षित (World Safest Country in Covid19) आहे, असा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडला आहे. तर त्याचं उत्तर आहे स्वित्झर्लंड. डीप नॉलेज ग्रुपने कोरोनाव्हायरसच्या महासाथीत कोणते देश सुरक्षित आहेत, यासाठी 200 देशांचा अभ्यास केला. कोरोनाव्हायरसला रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशांनी केलेल प्रयत्न, त्यांनी उचलली पावलं, घेतलेले निर्णय आणि अर्थव्यवस्था यावर आधारित हा अहवाल तयार करण्यात आला आहे आणि श्रेणीनुसार या देशांची विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या श्रेणीत जगातील सर्वात सुरक्षित 20 देशांचा समावेश आहे तर चौथ्या श्रेणीत सर्वाधिक धोका असलेले म्हणजे सर्वाधिक असुरक्षित देश आहेत. पहिल्या श्रेणीत स्वित्झर्लंड टॉपवर आहे. स्वित्झर्लंड हा जगातील सर्वात सुरक्षित देश असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. तर सर्वात जास्त धोका असलेल्या तिसऱ्या श्रेणीत भारताचा समावेश आहे. या यादीत भारत 56 व्या क्रमांकावर आहे. सुदान हा सर्वात असुरक्षित देश असून सर्वात शेवटी म्हणजे 200 व्या स्थानी आहे अहवालानुसार जगातील सर्वात सुरक्षित 10 देश पहिल्या दहा देशांमध्ये स्वित्झर्लंड आणि जर्मनी अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. तर त्यानंतर इज्राइल, सिंगापूर, जपान, ऑस्ट्रिया, चीन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया यांचा क्रमांक लागतो. हे वाचा - दिलासादायक! 'या' शहरात विकसित होतेय कोरोनाविरोधात हर्ड इम्युनिटी या सुरक्षित देशांच्या यादीत भारत अमेरिकेपेक्षा 2 क्रमांकाने वर 56 व्या स्थानी आहे. तर भारताशेजारील चीनचा पहिल्या दहा सुरक्षित देशांमध्ये समावेश आहे. पाकिस्तानची परिस्थिती खूपच गंभीर आहे. पाकिस्तान 148 व्या स्थानावर आहे. स्वित्झर्लंड, जर्मनी टॉपवर कसे? स्वित्झर्लंड आणि जर्मनी अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असण्याचं कारण म्हणजे तिथं लॉकडाऊन योगरित्या हाताळण्यात आलं. अर्थव्यवस्थेलाही कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेण्यात आली. याशिवाय दोन्ही देशांनी सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेवरही लक्ष दिलं, असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. जगभरातील कोरोनाव्हायरसचे 73 लाखांपेक्षा जास्त रुग्ण जगात आतापर्यंत 7,349,528 कोरोना रुग्णांची नोंद आहे. 3,627,234 रुग्ण बरे झालेत तर 414,262 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त रुग्ण अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील रुग्णांची संख्या 2,046,053 आहे. 114,167 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आहे. भारतात 276,583 कोरोना रुग्ण आहेत. 7,745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - "...तर कोरोना रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्याची गरज नाही"
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या