निम्म्यापेक्षा अधिक लोकांमध्ये कोरोनाविरोधी अँटिबॉडीज; 'या' शहरात विकसित होतेय हर्ड इम्युनिटी

निम्म्यापेक्षा अधिक लोकांमध्ये कोरोनाविरोधी अँटिबॉडीज; 'या' शहरात विकसित होतेय हर्ड इम्युनिटी

या शहरातील 57 टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधी अँटिबॉडीज (coronavirus antibodies) तयार झाल्याचं दिसलं.

  • Share this:

रोम, 10 जून : जगात सर्वात जास्त कोरोनाव्हायरसचे (coronavirus) रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत इटलीचा (Italy) समावेश आहे. या ठिकाणी कोरोनानं सुरुवातीला सर्वात जास्त थैमान घातलं. मात्र आता याच देशातून एक दिलासादायक बातमी म्हणजे. कोरोनामुळे प्रभावित झालेल्या या देशातील एक शहर हर्ड इम्युनिटीजवळ (Herd immunity) पोहोचत आहे.

इटलीतील बर्गामो (Bergamo) शहरात हर्ड इम्युनिटी विकसित होताना दिसते आहे. या शहरात 23 एप्रिल ते 3 जून दरम्यान 9965 लोकांचे ब्लड टेस्ट करण्यात आले. त्यामध्ये 57 टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधी अँटिबॉडीज तयार झाल्याचं दिसलं. याचा अर्थ या लोकांना कोरोनाव्हायरसचं संक्रमण झालं होतं. डेली मेलनं याबाबत वृत्त दिलं आहे.

हर्ड इम्युनिटी म्हणजे काय?

हर्ड इम्युनिटी म्हणजे जास्ती जास्त लोकांना व्हायरसची लागण होऊन त्यांच्यामध्ये व्हायरसविरोधी सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होणे. तज्ज्ञांच्या मते, जवळपास 60 ते 65 टक्के लोकसंख्या कोरोना संक्रमित झाल्यानंतर हर्ड इम्युनिटी विकसित होईल. यामुळे कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाची साखळी तुटेल, कोरोना संक्रमणाची नवीन प्रकरणं दिसणार नाहीत.

हे वाचा -  "...तर कोरोना रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्याची गरज नाही"

बर्गामोमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या अँटिबॉडी टेस्टसाठी रँडम सॅम्पल घेण्यात आले होते. व्यापक स्तरावर ही चाचणी झाली आहे आणि त्याचा निकाल म्हणजे एक आशादायी असा संकेत आहे. कोरोनाव्हायरसची अँटिबॉडीज असलेल्या लोकांमध्ये किती कालावधीसाठी ही रोगप्रतिकारक शक्ती कायम राहिल, याबाबत अद्याप संशोधन सुरू आहे.

हे वाचा - 6 महिन्यात पहिल्यांदाच कोरोनाबाबत आली दिलासादायक आकडेवारी

बर्गामो शहरात कोरोनाव्हायरसचं पहिलं प्रकरण फेब्रुवारीत समोर आलं. त्यानंतर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं. इटलीत गेल्याच आठवड्यात लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. देशात 235,000 लोकं संक्रमित झालेत, तर 34 हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - 'या' कपाटात लपली आहे मांजर; शोधा बरं तुम्हाला सापडतेय का?

First published: June 10, 2020, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading