मराठी बातम्या /बातम्या /विदेश /भय इथले संपत नाही! ब्रिटनमध्ये कोरोनाची चौथी तर फ्रान्समध्ये पाचवी लाट; भारतावरही सावट

भय इथले संपत नाही! ब्रिटनमध्ये कोरोनाची चौथी तर फ्रान्समध्ये पाचवी लाट; भारतावरही सावट

कोरोना संसर्ग केव्हाही पुन्हा आपलं डोकं वर काढू शकतो, याची प्रचिती सध्या ब्रिटन आणि फ्रान्स हे देश घेत आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या चौथ्या आणि फ्रान्समध्ये पाचव्या लाटेने दहशत निर्माण केली आहे.

कोरोना संसर्ग केव्हाही पुन्हा आपलं डोकं वर काढू शकतो, याची प्रचिती सध्या ब्रिटन आणि फ्रान्स हे देश घेत आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या चौथ्या आणि फ्रान्समध्ये पाचव्या लाटेने दहशत निर्माण केली आहे.

कोरोना संसर्ग केव्हाही पुन्हा आपलं डोकं वर काढू शकतो, याची प्रचिती सध्या ब्रिटन आणि फ्रान्स हे देश घेत आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या चौथ्या आणि फ्रान्समध्ये पाचव्या लाटेने दहशत निर्माण केली आहे.

    नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : साधारण गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने (corona pandemic) धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत कोट्यवधी नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, अनेकांनी जीवदेखील गमावले आहेत. चीनमधून सुरू झालेला कोरोनाचा कहर संपूर्ण जगभर पसरला होता. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना करताना जगातल्या मोठमोठ्या देशांचेदेखील प्रचंड हाल झाले होते. दरम्यानच्या काळात संशोधकांना कोरोनाची लस तयार करण्यात यश आलं. सध्या जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची (Corona vaccination) मोहीम सुरू आहे. त्यामुळं कोरोनाची तीव्रता काहीशी कमी झाल्याचं चित्र आहे.

    भारतामध्येदेखील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये घट झाली आहे. प्रसाराची तीव्रता कमी झाली असली, तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मात्र लस घेतल्यानंतर नागरिकांचा निष्काळजीपणा वाढताना दिसत आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्यास सुरुवात केली असून, सुरक्षिततेच्या कुठल्याही नियमांचं ते पालन करत नाहीत, असं दिसत आहे. भारतामध्ये तिसरी लाट येणारच नाही, अशा आविर्भावामध्ये नागरिक बिनधास्त वावरत आहेत. ही गोष्ट जीवघेणी ठरू शकते, हे नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. कोरोना संसर्ग केव्हाही पुन्हा आपलं डोकं वर काढू शकतो, याची प्रचिती सध्या ब्रिटन (Britain) आणि फ्रान्स (France) हे देश घेत आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या चौथ्या आणि फ्रान्समध्ये पाचव्या लाटेने दहशत निर्माण केली आहे.

    ब्रिटनने जून (2021) महिन्यामध्ये कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटवले होते. तेव्हापासूनच या ठिकाणी कोरोना संसर्गाची चौथी लाट सुरू झाली होती. मात्र सुरुवातीच्या काळात तिची तीव्रता कमी होती. ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, सध्या त्या देशात सरासरी 40 हजार नवीन रुग्ण आढळत आहेत. दररोज जवळपास 150 ते 200 रुग्णांचा मृत्यू होत आहे. 21 ऑक्टोबर 2021 रोजी ब्रिटनमध्ये 51 हजार 484 रुग्ण आढळले होते. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजे 10 नोव्हेंबरला 39 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली. ब्रिटनसोबतच फ्रान्समध्येही कोरोनाची स्थिती आवाक्याबाहेर जात आहे. फ्रान्समध्ये 4 ऑक्टोबरपासून कोरोना प्रसाराची पाचवी लाट सुरू झाली आहे. सध्या या ठिकाणी सरासरी 10 हजार नवीन रुग्णांची नोंद होत असून, दररोज 40 मृत्यू होत आहेत. वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार 10 नोव्हेंबर रोजी फ्रान्समध्ये 11 हजार 883 नवीन रुग्ण आढळले, तर 33 मृत्यू झाले.

    'देशात पाचवी लाट भयंकर रूप धारण करण्याची स्पष्ट चिन्हं दिसत आहेत. ही अतिशय चिंतेची बाब आहे. येऊ घातलेला हिवाळा पाहता परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे,' असं मत फ्रान्सचे आरोग्यमंत्री ऑलिव्हियर वेरेन (Olivier Véran) यांनी व्यक्त केलं आहे. भविष्यातला धोका लक्षात घेऊन फ्रान्स सरकारने 65 वर्षांवरच्या वृद्धांना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यासाठी बूस्टर डोसचं (booster dose) प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक केलं आहे. दुसरीकडे ब्रिटिश शास्त्रज्ञांनीदेखील बोरिस जॉन्सन (Boris Johnson) सरकारला शेजारी देशांप्रमाणं वेळीच कठोर निर्बंध लादण्याची विनंती केली आहे.

    या ठिकाणी 100 वर्षांपासून एकही मृत्यू नाही,सरकारकडून मरणावर बॅन;सांगितलं हे कारण

    कोरोना महामारीमुळे संपूर्ण युरोपमध्ये रशियानंतर ब्रिटनमध्ये सर्वाधिक 1.42 लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिशय वेगाने लसीकरण केलं आहे. आतापर्यंत त्या देशात 68.3 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असून, 74.8 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना बूस्टर डोस देण्याचं काम सुरू आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 68.6 टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालं असून, 76.3 टक्के नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. फ्रान्सने 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकसंख्येला बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. असं असूनही, ब्रिटनमध्ये 4 टक्के आणि फ्रान्समध्ये 2.9 टक्के वेगानं कोरोना संसर्ग पसरत आहे.

    चीनच्या अध्यक्षांच्या नावाचं स्पेलिंग Xi Jinping आहे, तरीही उच्चार शी जिनपिंग असा का?

    ब्रिटन आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी झपाट्यानं लसीकरण केलं आहे. त्यामुळे संसर्गग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी फायदा होत आहे. रुग्णसंख्या जास्त असली तरी गंभीर रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा खूपच कमी आहे. फ्रान्समध्ये सध्या 1076 रुग्ण आयसीयूमध्ये, तर 6702 रुग्ण जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत. ब्रिटनमध्ये सध्या 9000 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी 1022 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. लसीकरण झाल्यामुळे कोरोना संसर्गाचा रुग्णांवर गंभीर परिणाम होत नाही.

    फ्रान्स आणि ब्रिटनमधली एकूण परिस्थिती लक्षात घेता भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांनी अधिक काळजी घेणं अपेक्षित आहे. कारण, युरोपीयन देशांमध्ये सध्या पसरत असलेल्या कोरोना विषाणूचा स्ट्रेन जास्त घातक असल्याचं समोर आलं आहे. भारतामध्ये तिसरी लाट आली तर मोठा गोंधळ उडण्याची भीती वर्तवली जात आहे.

    First published:
    top videos

      Tags: Corona virus in india, Coronavirus cases