Home /News /videsh /

Corona चा पहिला रुग्ण सापडला, ज्याच्यामुळे संपूर्ण देश व्हायरसच्या विळख्यात आला

Corona चा पहिला रुग्ण सापडला, ज्याच्यामुळे संपूर्ण देश व्हायरसच्या विळख्यात आला

इटलीतील (Italy) कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) या पहिल्या रुग्णाला पेशंट 1 म्हटलं आहे.

    रोम, 24 मार्च : चीनच्या (china) वुहाननंतर (wuhan) आता इटलीतील लोम्बार्डी (Lombardy) शहराला आपलं केंद्र बनवलं आहे. याच शहरात देशातील कोरोनाव्हायरसचा (coronavirus) पहिला रुग्ण आहे, ज्याच्यामुळे संपूर्ण देश व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. इटलीचे पंतप्रधान Giuseppe Conte यांनी कोरोनाव्हायरससंबंधित एका पत्रकार परिषदेत एका रुग्णालयाला कोरोना पसरवण्यासाठी जबाबदार ठरवलं आहे. पंतप्रधानानी या रुग्णालयाचं नाव सांगितलं नाही, मात्र त्या रुग्णाला पेशंट 1 (patient 1) म्हटलं आहे. मिलानच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. हे वाचा - महाराष्ट्रात चिंता वाढली, कोरोना रुग्णांची संख्या 101 वर पंतप्रधानांनी सांगितलं की, पेशंट 1 ताप आल्यानंतर स्वत: रुग्णालयात आला होता. तरीदेखील रुग्णालयानं त्याला दोनदा घरी पाठवलं. सर्दी-तापाची समस्या असलेला हा रुग्ण 14 फेब्रुवारीला लोम्बार्डीतील एका रुग्णालयात पोहोचला. तिथं रुग्णालय प्रशासनानं त्याला फ्लू असल्याचं सांगून पॅरासिटामोल देऊन तपासणी न करताच घरी पाठवलं. 2 दिवसांनंतरही ताप कमी न झाल्यानं 16 फेब्रुवारीला तो पुन्हा रुग्णालयात आला. मात्र तरीही डॉक्टरांनी त्याला पुन्हा घरी पाठवलं. तिसऱ्या वेळी 19 फेब्रुवारीला त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं. त्याला श्वास घेण्यात समस्या होती, ताप होता, घशात वेदनाही होत होत्या. तेव्हा त्याची तपासणी करण्यात आली आणि तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. हे वाचा - Good News: भारतातील 37 रुग्णांनी केली कोरोनावर मात, आज रुग्णालयातून होणार सुट्टी या काळात कोरोना संक्रमित असताना हा रुग्ण अनेकांच्या संपर्कात आला. या रुग्णाच्या गर्भवती पत्नीला, ज्याच्यासह तो सकाळी जॉगिंगला जायचा त्या मित्राला, दररोज भेटणाऱ्या 3 वृद्धांनाही या व्हायरसची लागण झाली होती. याशिवाय रुग्णालयातील 8 जण जे या व्यक्तीच्या संपर्कात आले होते. तेदेखील सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह झाले. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. या रुग्णाबाबत रुग्णालयाने इतका हलगर्जीपणा केला की तिसऱ्या वेळी रुग्णालयात आलेल्या या रुग्णाला दाखल करून घेतल्यानंतर तो कोरोना संक्रमित असल्याचं निदान झाल्यानंतरही जवळपास 36 तास त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं नाही. याच 36 तासांमध्ये डॉक्टर, इतर रुग्णांसह रुग्णालयात येणारे इतर लोकही संक्रमित झाले. या एका रुग्णामुळे जवळपास 200 रुग्णांपर्यंत व्हायरस पसरला असं मानलं जात आहे. हे वाचा - Coronavirus हवेतून पसरू शकतो? WHO ने केलं सावध, काय सांगतं संशोधन? इटलीमध्ये (Italy) कोरोनाव्हायरमुळे (coronavirus) चीनमधील मृतांच्या जवळपास दुप्पट रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 38 वर्षांच्या या रुग्णाला पेशंट 1 म्हटलं आहे. या व्यक्तीमुळे संक्रमण इतक्या झपाट्यानं पसरलं की त्याला सुपर स्प्रेडर (super-spreader) ही म्हटलं जातं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या