नवी दिल्ली 23 मार्च : कोरोनाव्हायरसचा (coronavirus) धोका टाळण्यासाठी शिंकताना, खोकताना तोंडावर रूमाल ठेवा. हात नीट स्वच्छ धुवा असा सल्ला दिला जातो आहे. कोरोनाव्हाययरसच्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर किंवा त्याने स्पर्श केलेल्या वस्तूंना स्पर्श केल्यानंतर कोरोनाव्हायरसची लागण होते आहे. मात्र ज्या हवेत आपण श्वास घेत आहोत, त्या हवेमार्फत (airborn) तर आपल्याला कोरोनाव्हायरसचा धोका तर नाही ना, असा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडला आहे. Google वर हाच प्रश्न अनेकांनी विचारलेला दिसतो. Coronavirus हा Airborn अर्थात हवेतून पसरणारा रोग आहे का?
कोरोनाव्हायरस हवेत काही तास जिवंत राहू शकतो, असं संशोधनातून समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं नुकतंत सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना काळजी घेण्याचा सूचना दिल्यात. त्यामुळे हवेमार्फत कोरोनाव्हायरस पसरतो आहे का, अशी भीती निर्माण झाली आहे.
The World Health Organization is considering “airborne precautions” for medical staff after a new study showed the coronavirus can survive in the air in some settings. https://t.co/cbDB59zqap
— CNBC (@CNBC) March 17, 2020
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये (New England Journal of Medicine) प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार कोरोनाव्हायरस हा हवेत 3 तासांपर्यंत राहू शकतो.
हे वाचा - Corona चा खरा चेहरा दिसणार, व्हायरसने तिसरा टप्पा तर गाठला नाही ना? उद्या समजणार
कोरोनाव्हायरसची हवेत तग धरण्याची क्षमता तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी न्यूबिलायझरच्या माध्यमातून व्हायरस एअरबॉर्न केला. 3 तासांसाठी हा व्हायरस हवेत राहत असल्याचं दिसून आलं.
शास्त्रज्ञांनी रुग्णालयातही तपासणी केली. त्यावेळी तिथल्या जमिनीवर, भिंतींवर कोरोनाव्हायरस आढळले, जे शिंकल्यानंतर आणि खोकल्यानंतर थेंबामार्फत पसरले होते. मात्र हवेत हा व्हायरस नव्हता. जमिनीवरील व्हायरसचा निर्जंतुकीकरणानंतर नाश झाला.
Airborne spread hasn't been reported for #COVID19. Chinese authorities reported possibility of aerosol transmission in a relatively closed environment with prolonged exposure like ICUs-CCUs in hospitals, but more epid data analysis is needed to understand this:WHO South-East Asia pic.twitter.com/DZ7mU6RdnB
— ANI (@ANI) March 23, 2020
शास्त्रज्ञांनी व्हायरसला यासाठी एअरबोर्न करून पाहिलं कारण अशा अनेक वैद्यकीय प्रक्रिया आहेत, ज्यामुळे रुग्णाच्या शरीरातील व्हायरस हवेत पसरतो आणि हा व्हायरस हवेत राहिल्यास डॉक्टर, नर्सच्या आरोग्यालाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळेच या संशोधनानंतर जागतिक आरोग्य संघटनेनंही वैद्यकीय अधिकाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात.
हे वाचा - सावधान! स्टेज 3 चा Coronavirus आहे महाभयानक, तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी होईल अवस्था
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus