जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Coronavirus : ‘या’ देशातील घरांमधून काढले तब्बल 800 मृतदेह, वैद्यकीय अधिकारी हादरले

Coronavirus : ‘या’ देशातील घरांमधून काढले तब्बल 800 मृतदेह, वैद्यकीय अधिकारी हादरले

Coronavirus : ‘या’ देशातील घरांमधून काढले तब्बल 800 मृतदेह, वैद्यकीय अधिकारी हादरले

इतक्या मोठ्या संख्येने मृतदेह सापडल्याने या देशात खळबळ माजली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ग्वायाक्विल, 13 एप्रिल : इक्वाडोरमध्ये कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 7466 पर्यंत पोहोचली आहे. तर अधिकृत आकड्यांनुसार येथे 350 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचं केंद्र ग्वायाक्विलमध्ये पोलिसांनी घरांचा शोध घेतल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेनंतर दक्षिण अमेरिकेतील देश इ्क्वाडोरमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांना घरांमध्ये तब्बल 800 मृतदेह सापडले आहेत. इक्वाडोर पोलिसांनी सांगितले की मृत्यू झालेल्यांना कोरोनाची बाधा झाली होती का याचा तपास केला जात आहे. ग्वायाक्विलमध्ये रुग्णालये आणि वैद्यकीय सेवेवर मोठा दबाव आहे. या शहरात मृतदेहांना दफन करण्याचे काम सुरू आहेत. मात्र इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू झाल्याने ही सेवा कमी पडत आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात लोक व्हिडीओ शेअर करीत आहेत. ज्यात रस्त्यांवर मृतदेह पडल्याचे दिसत आहे. कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी पोलीस आणि सैन्यातील कर्मचारी मदत करीत आहेत. लोकांच्या घराघरांमधून एकत्र केलेल्या मृतदेहांची संख्या 700 हून अधिक आहे. 600 हून अधिक शव तपासणीशिवाय दफन केले गेले इक्वाडोर पोलिसांनी रविवारी ट्विटवर सांगितले की संयुक्त कार्यबळाने गेल्या तीन आठवड्यात एका अभियानात घरांतून 771 मृतदेह आणि रुग्णालयातून 631 मृतदेह ताब्यात घेतले आहेत. अद्याप त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. यापैकी 600 जणांना अधिकाऱ्यांनी दफन केले आहे. इक्वाडोरमध्ये 29 फेब्रुवारी रोजी कोरोना व्हायरसचं पहिलं प्रकरण समोर आले होतं. त्यानंतर 7500 प्रकरणं समोर आली आहेत. हे वाचा - पुण्यातले सगळे खासगी डॉक्टर आता सरकारच्या आधीन, कोरोना रुग्णांवर उपचार करणार राज्यातील 40 बेपत्ता तबलिगींना शोधण्यात पोलिसांना यश, 18 जणांचा शोध अद्याप सुरू Lockdown असतानाही जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात