Lockdown असतानाही जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद

Lockdown असतानाही जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद

गेले काही दिवस ताबा रेषेवर पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. भारतही त्याला जोरदार प्रत्युत्तर देतोय.

  • Share this:

श्रीनगर 13 एप्रिल : जम्मू आणि काश्मीरमध्येही कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. सगळे व्यवहार बंद आहेत. कुणालाही घराबाहेर पडता येत नाही. अशाही परिस्थितीत तिथे दहशतवादी हल्ले होत आहेत. किश्तवार जिल्ह्यातल् दाचन भागात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या एका पथकावर हल्ला केला. यात एक जवान शहीद झाला तर एक जवान जखमी झाला. दहशतवाद्यांनी त्यांच्याकडच्या बंदुका पळवून नेल्या आहेत. सगळीकडे बंद असतानाही दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्याबद्दल आश्चर्य व्यक्ते केलं जात आहे.

गेले काही दिवस ताबा रेषेवर पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. भारतही त्याला जोरदार प्रत्युत्तर देतोय. जम्मू काश्मीर जवळच्या केरन सेक्टर जवळ पाकिस्तानच्या हद्दीत असलेले दहशतवाद्यांचं एक लाँचपॅड भारताने जबर कारवाई करत उद्धवस्त केलं. या कारवाईत पाकिस्ताने 15 सैनिक आणि 8 दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त ‘हिंदुस्थान टाईम्स’ने दिलं आहे. 10 एप्रिलला ही कारवाई करण्यात आली होती. पाकिस्तानला हा मोठा दणका मानला जातोय.

दरम्यान, सर्व जग कोरोनाविरुद्ध लढत असताना पाकिस्तान सीमेवरची आगळीक काही कमी करत नाही. काहीतरी कुरापत काढून तो दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. सर्जिकल स्ट्राईक नंतरही पाकिस्तानच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. दहशतवद्यांचे काही लाँच पॅड्स पुन्हा सक्रिय करण्याचा त्यांचा  प्रयत्न भारताने हाणून पाडला आहे.

दिल्ली पुन्हा भूकंपाने हादरली, 24 तासांमध्ये दुसरा धक्का

काही दिवसांपूर्वीही पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. तेव्हाही भारताने प्रत्युत्तरादाखल कारवाई केली होती.

काश्मीरमध्ये केरन सेक्टरमधील कुपवाडा इथं नुकतीय भारतीय लष्कराची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. पाचही दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त करण्यात आलं. यात अशा प्रकराची कपडे सापडली जी याआधी कधीच पाहिली नव्हती. घुसखोरी करण्यासाठी खास प्रकारची ही कपडे तयार करण्यात आली आहेत. एवढंच नाही तर त्यांच्याकडून यूनिकोड चार्टसुद्धा जप्त केला आहे.

LockDown : कंटाळा आल्यावर मित्राकडे जाण्यासाठी जुगाड, सुटकेसमध्ये बसला आणि...

केरन सेक्टरच्या जमगुंड भागात माहिती मिळाल्यानंतर एक एप्रिलला भारतीय लष्कराने शोधमोहिम सुरू केली होती. यावेळी दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यामध्ये दहशतवादी जंगलाच्या दिशेनं गेलं होते. पाच दिवस चाललेल्या या शोधमोहिमेवेळी पुन्हा एकदा दहशतवाद्यांशी चकमक झाली यात पाच जणांना लष्कराने कंठस्नान घातलं. यावेळी पाच जवानसुद्धा शहीद झाले होते.

First published: April 13, 2020, 3:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या