राज्यातील 40 बेपत्ता तबलिगींना शोधण्यात पोलिसांना यश, 18 जणांचा शोध अद्याप सुरू

राज्यातील 40 बेपत्ता तबलिगींना शोधण्यात पोलिसांना यश, 18 जणांचा शोध अद्याप सुरू

यापूर्वी 58 तबलिगींना ताब्यात घेण्यात आले होते, त्यानंतर आता 40 तबलिगींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत असताना हा आकडा 9000 पार गेला आहे आणि मृतांची संख्या 300 हून अधिक आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने नागरिकांमधील चिंता वाढत आहे. दरम्यान महाराष्ट्राचे (Maharashtra) गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सोमवारी सांगितले की, ताब्यात असलेल्या तबलिगी जमातच्या 58 सदस्यांकडून बेपत्ता झालेल्या 40 जणांची माहिती मिळाली आहे आणि त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

हे 58 जणं गेल्या महिन्यात दिल्लीतील निजामुद्दीन जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मंत्र्यांनी सांगितले की या इस्लामिक संघटनेचे आणखी 18 सदस्य अद्याप बेपत्ता आहेत. पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू आहे.

त्यांनी सांगितले की गेल्या आठवड्यापर्यंत या संघटनेतील 58 सदस्य बेपत्ता होते. यापैकी अनेकांनी आपला मोबाइल बंद करुन ठेवला होता. त्यामुळे यांना शोधण्यात अडचणी जाणवत होत्या. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी यापैकी 40 जणांना विविध क्लृप्त्या लढवित शोधले आहेत. या सर्वांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे आणि आरोग्य मंत्रालयाच्या आदेशानुसार या सर्वांची कोरोना तपासणी केली जाणार आहे.

मंत्री या 40 जणांबद्दल म्हणाले, ‘ते भारतीय आहेत. आम्ही त्यांना क्वारंटाइन ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. जर त्यांच्या रिपोर्ट निगेटिव्ह आला तर प्रक्रिया करुन त्यांना सोडण्यात येईल.’ राज्यातील अधिकाऱ्यांनी यापूर्वी 156 परदेशींचा नागरिकांना ताब्यात घेतले आहे. हे नागरिक दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्यावर व्हिसाचा दुरुपयोगासह अन्य गुन्हांचे आरोप लावण्यात आले आहेत.

संबंधित -

कोरोनाच्या फैलावावर तज्ज्ञांकडून डिस्चार्ज प्रोटोकॉल जारी करण्याचे आदेश

Coronavirus गर्दी हटवण्यासाठी भाजी बाजारात आता नवा सम-विषम प्रयोग

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: April 13, 2020, 4:08 PM IST

ताज्या बातम्या