लंडन 31 मार्च : कोरोनामुळे जगळं जगच घरात बंदिस्त झालं आहे. 180 पेक्षा जास्त देश कोरोना व्हायरसविरुद्ध लढत आहेत. मात्र त्यावर अजुनही औषध सापडलेलं नसल्याने पुढे काय होणार हे आता कुणालाच सांगता येत नाही. मात्र यामुळे सर्व जागाचाच व्यवहार बदलून जाऊ शकतो असा दावा काही तज्ज्ञांनी केलाय. तर दररोजच्या जगण्यातल्या दोन गोष्टी हमखास बदलणार आहेत असा दावा सामाजिक शास्त्रज्ञांनी केला आहे. कोरोना हा व्हायरस स्पर्शातून आणि एकमेकांच्या जवळ येण्याने पसरत असल्याने सोशल डिस्टंन्सिंग ठेवण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे ‘शेकहँड’ आणि ‘गळाभेट’ घेणं सध्यातरी बंदच झालं आहे. जगभर माणसं एकमेकांप्रती प्रेम दाखविण्यासाठी या दोन पद्धतीचा वापर करतात. एकमेकांच्या भावनांचं आदान-प्रदान करण्यासाठीही याचा वापर केला जातो. कोरोनामुळे जसा आर्थिक फटका बसणार आहे त्याच प्रमाणे भावनिक पातळीवरही हे फार मोठं नुकसान होणार असल्याचं मतही काही मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केलं. एकमेकांशी हस्तांदोलन करणं आणि एकमेकांना मिठी मारणं हे जसं आदर आणि प्रेम दाखविणारं आहे, तसेच भावनिक दृष्ट्याही महत्त्वाचं आहे. दररोजच्या जगण्यात माणसाला या भावनिक आधाराची गरज असते. हे वाचा - मक्का-मदिनेतल्या मशिदी बंद होऊ शकतात तर भारतातल्या का नाही? – जावेद अख्तर मात्र अशीच परिस्थिती राहिल्यास या दोनही गोष्टी हद्दपार होऊ शकतात असा दवा केला जातोय. तर काही तज्ज्ञ ही शक्यता फेटाळून लावत आहेत. हे फक्त काही महिने किंवा वर्षापर्यंतच राहू शकते. नंतर मात्र लोक पुन्हा गळाभेटी घेतील आणि शेकहँडही करतील असं त्यांना वाटतं. COVID-19 ची प्रकरणं वाढत आहेत, मात्र यामुळे घाबरण्याची गरज नाही. भारत सहजरित्या हा लढा जिंकेल, असं त्यांनी म्हटलं. पद्मभूषण डॉ. डी नागेश्वर रेड्डी एशियन इन्स्टिट्युट ऑफ गॅस्ट्रोएंटरोलॉजीचे चेअरमन आहेत. त्यांनी कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाबाबत नवी माहिती दिली आहे. हे वाचा - दिल्लीतील एका चुकीमुळे देशभरात खळबळ, मुंबईपासून-अंदमानपर्यंत पसरला कोरोना इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत डॉ. नागेश्वर रेड्डी म्हणाले, “कोरोना हा एक आरएनए व्हायरस आहे. तो वटवाघळापासून माणसांपर्यंत पसरला. मात्र जेव्हा हा व्हायरस इटली, अमेरिका आणि भारतात पसरला तेव्हा त्याचे जीनोटाइप्स वेगळे झाले असणार. पूर्ण व्हायरसची सीक्वेंसिंग 4 देशांमध्ये करण्यात आली आहे. पहिला अमेरिका, दुसरा इटली, तिसरा चीन आणि शेवटी भारत आहे” “अभ्यासात असं दिसून आलं की इटलीपेक्षा भारतातील व्हायरसचे जीनोम वेगळे आहेत. भारतात आलेल्या कोरोनाव्हायरसच्या जीनोमचे स्पाइक सिंगल म्युटेशन असलेले आहेत. सिंगल म्युटेशन असलेला व्हायरस एक आठवड्यातच कमजोर होतो. त्यामुळे भारतासाठी कोरोनाविरोधातील लढा जिंकण जास्त कठीण नाही.”, असं डॉ. रेड्डी यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







